सोलापूर : अधिकारी होण्याची तीव्र इच्छा असणारा मरवडे (ता. मंगळवेढा) येथील सचिन तात्यासाहेब पवार (वय २८) हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मात्र घराच्या बांधकामांवर पाणी मारत असताना विद्युत पंपाद्वारे पाण्यात उतरलेल्या करंटने त्याचा मृत्यू झाला. The young man who dreamed of becoming an officer died of shock and marriage was about to begin
नव्याने सुरु असलेल्या घराच्या बांधकामांवर छोट्या विद्युत पंपाद्वारे पाणी मारत असताना विजेच्या धक्क्याने मरवडे येथील सचिन तात्यासो पवार (वय २८) या उच्चशिक्षित युवकाचे निधन झाले.
सचिनच्या लग्नाबाबत बोलणी सुरु होती. काल गुरुवारी (ता. 9) दुपारी मुलीकडचे लोक घर पाहण्यासाठी येणार होते. तत्पूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.
या घटनेमुळे मरवडे गावावर शोककळा पसरली आहे. मरवडे – चडचण रस्त्यालगत स्वतःच्या शेतीमध्ये नव्याने सुरु असलेल्या बांधकामांवर पाणी मारण्यासाठी सचिन पवार हा तरुण सकाळी आठच्या सुमारास धाकटा भाऊ संकेत यांस सोबत घेऊन गेला होता.
विजेची केबल पाण्यात पडल्याने घराच्या छतावर विजेचा करंट पसरला. विजेच्या जोरदार धक्क्याने त्याची होणारी अवस्था लक्षात येताच प्रसंगावधान राखून संकेतने विद्युत प्रवाह बंद केला. मात्र तोवर काळाने सचिनवर झडप घातली. त्यास उपचारासाठी पंढरपूर येथे दाखल केले. मात्र हा विजेचा धक्का इतका तीव्र होता की उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर दुपारी अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी पाण्याच्या दाबाने पाईप निघाल्याने तो जोडण्याचा प्रयत्न करीत असतानाच छोटी पाण्याची मोटार उंचावरुन खाली पाण्यात पडली त्याचबरोबर विजेची केबल निसटून पाण्यात पडल्याने घराच्या छतावर विजेचा प्रवाह पसरला.
पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शल्यचिकीत्सा झाल्यानंतर दोन वाजता सचिनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सचिन हा उच्चशिक्षित होता. शिवाय स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. वडील तात्यासो पवार हे हॉटेल व्यावसायिक असून धाकटा भाऊ संकेत हा बांधकाम व्यावसायिक आहे.
मरवडे येथे बिल्डिंग मटेरीयलचा मोठा व्यवसाय आहे. दोन्ही व्यवसायात तो अलिकडे वेळ देऊ लागला होता. त्याच्या निधनामुळे पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/558555819155485/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ सेवानिवृत्त घेतलेल्या पोलीस हवालदाराने घेतला सोलापुरात गळफास
सोलापूर : कारागृहात हवालदार पदावर काम केलेल्या कल्याण दगडू गावसाने यांनी सोलापुरात राहत्या घरी काल गुरूवारी (ता.9 ) सायंकाळी गळफास घेवून आत्महत्या केली.
असाध्य आजारानंतर उस्मानाबादहून गावसाने यांची नाशिकला बदली झाली होती. उपचारासाठी पैसे कमी पडत असल्यानं त्यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. मात्र त्यांचे शासकीय देय रक्कम त्यांना मिळालेली नव्हती. नाशिक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेवूनही हे काम करत नसल्यानं ते त्रस्त होते. यामुळंच त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती पत्नी आणि मुलानं प्रसारमाध्यमांशी बोलताना आज दिली. गावसाने यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला आहे.
कल्याण गावसाने यांनी सोलापुरातील माशाळ वस्ती येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते नाशिक कारागृहात कार्यरत होते. गावसाने यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. सेवा निवृत्तीनंतर दिल्या जाणाऱ्या पेन्शनसाठी कारागृह प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्यानेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप मृत हवालदाराच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कल्याण गावसाने यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून त्यांना पेन्शनसाठी मानसिक त्रास दिला जात होता त्यामुळे या आत्महत्ये प्रकरणी नाशिक मध्यवर्ती कारागृहातील आवारे मॅडम आणि गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा गावसाने कुटुंबीयांनी प्रशासनाला दिला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/558564202487980/