सोलापूर : सोलापुरात मोठ्या संख्येने लोक भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अटकेच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. एमआयएमच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांना अटक करा, अशी मागणी या मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. हजारोंच्या संख्येने लोक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. Big agitation in Solapur, thousands of Muslims on the streets
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांनी केलेल्या आक्षेपार्ह्य विधानाच्या निषेधार्थ राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. राज्यातील सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर अशा महत्वाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहेत. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशभरातून अनेक मुस्लिम संघटनांनी त्याचा निषेध व्यक्त केला.
भाजपच्या या दोन्ही नेत्यांच्या अटकेसाठी सोलापुरातील एमआयएम पक्षाच्यावतीने शुक्रवारी (दि.१०) अडीच वाजता सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एमआयएमचे शहराध्यक्ष हाजी फारूख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
एमआयएमच्यावतीने भाजपच्या या दोन्ही नेत्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा. अशी मागणी करत, जिल्हाधिकार्यांना याचे निवेदन देण्यात आले. भाजपच्या नेत्यांकडून नेहमीच मुस्लिम धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. या विरोधात सरकारने ठोस पाऊले उचलावीत अन्यथा येणार्या काळात मुस्लिम समाज भाजपला धडा शिवल्याशिवाय राहणार नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
एमआयएम हा पक्ष सर्वधर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही धर्मावर टीका करत नाही. भाजपसारख्या जातीयवादी पक्षाने हा प्रकार वेळीच थांबवला नाही तर, येणार्या काळात आम्ही त्यांना धडा शिकवू असेही फारूख शाब्दी म्हणाले. यावेळी काढण्यात आलेल्या मोर्चात एमआयएम पक्षाचे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपनेते नुपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झालेला आज शुक्रवारी पाहायला मिळाला. हजारोच्या संख्येने आज रस्त्यावर उतरला होता. आज मोठे शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहण्यात आले.
सोलापुरातील मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांनी या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
तसेच नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी या संस्था आणि संघटनांच्यावतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन देखील देण्यात आली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/558507819160285/