मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते. पहाटेच्या या शपथविधीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आज पहाटे राज्यसभेचा निकाल जाहीर झाला. हा निकालही धक्का देणारा ठरला. संजय पवार जिंकतील, असा पूर्ण विश्वास असलेल्या शिवसेनेला भाजपच्या धनंजय महाडिकांनी पराभूत केले. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना पहाटेचे धक्कादायक सरप्राईज दिले, अशी चर्चा सुरुय.Shocking ‘dawn’! Rajya Sabha election results Dhananjay Mahadik Sanjay Pawar woke up the whole of Maharashtra
महाराष्ट्रात ज्या प्रकारे राजकीय नेते निवडणुकीला सामोरे जात आहेत, ते पाहता राज्यात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अवघ्या 6 जागांसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली. मतमोजणीसाठी जवळपास सर्व आमदार व मंत्री रात्रभर जागे होते. तसेच कोण जिंकणार? हे पाहण्यासाठी लाखो कार्यकर्ते रात्रभर प्रतिक्षेत होते. शेवटी महाविकास आघाडीने 3 व भाजपने 3 जागा जिंकल्या.
राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत अटीतटीची लढत पहायला मिळाली. या सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक यांचा दणदणीत विजय झाला असून शिवसेनेचे संजय पवार हे पराभूत झाले आहेत. यामुळे शिवसेनेसह आघाडी सरकारला या निकालानंतर मोठा झटका लागला आहे. भाजपचे धनंजय महाडिक यांना ४१ मतं मिळाली तर शिवसेनेचे संजय पवार यांना ३३ मतं पडली.
यासह राज्यसभेच्या इतर जागांसाठी प्रफुल्ल पटेल यांना ४३ मतं, संजय राऊत यांना 41मतं, पियुष गोयल यांना 48मतं , अनिल बोंडे यांना ४८ मतं आणि इम्रान प्रतापगडी यांना ४४ मतं असे पहिल्या पसंतीचे मतं मिळाल्याने ते विजयी झाले आहेत.
महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे या सामन्याचे ‘मॅन ऑफ द मॅच’ हे देवेंद्र फडणवीस हेच आहेत. समोर शरद पवार यांच्यासारखा दिग्गज असतानाही त्यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/558920805785653/
‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’ असं देवेंद्र फडणवीसांनी महाडिकांच्या विजयानंतर ट्वीट केलं आहे.
सुरुवातीपासून शिवसेनेच्या संजय पवारांचे पारडे जड असतानाही शेवटी भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणीसांनी महाविकास आघाडीकडे शरद पवार यांच्यासारखा दिग्गज समोर असतानाही अचूक स्ट्रॅटेजी आखली आणि विजय खेचून आणला.
देवेंद्र फडणवीस या विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार निवडून आल्याने आनंदाचा क्षण आहे. हा विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो. राज्यातील लोकांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बहुमत दिलं होतं.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनंजय महाडिक यांनी 41.5 मतं मिळाली तर शिवसेनेच्या संजय राऊत यांना 41 मतं मिळाली. जे मत बाद झालं, ते मत ग्राह्य धरलं असतं, किंवा मलिकांना मताचा अधिकार दिला असता तरी आमचा उमेदवार निवडून आला असता. यामध्ये ज्या अपक्षांनी आम्हाला मतं दिली त्यांचे आभार. जे स्वत:ला महाराष्ट्र समजतात, त्यांना या विजयाने लक्षात आलं असेल की ही जनता म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई आहेत. ही विजयाची मालिका सुरू झाली आहे ती आता कायम सुरू राहिल, असा टोला लगावला.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास 9 मतं फुटल्याची चर्चा आहे. यात धनंजय महाडिक यांचा विजय झाला. महाविकास आघाडीनं शक्तीप्रदर्शन केलं, चार उमेदवार जिंकणार असे दावे केले. पण देवेंद्र फडणवीसांनी पडद्याआड राहुन निवडणुकीचं प्लॅनिंग केलं. मतदानाच्या काही तास आधी आमदारांना विश्वासही दिला आणि तोच विश्वास निकालानंतर खरा ठरला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/558935902450810/