सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच समितीने 10 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचं निमंत्रण दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही समितीला दिली. The Vitthal Rukmini Temple Committee met the Chief Minister and extended an invitation
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (10 जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. मंदिर समितीच्यावतीने औसेकर महाराज यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची मूर्ती, वीणा, शेला-पागोटे देऊन सत्कार केला.
निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चाही केली. “पंढरपुरातील विकासकामांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसेच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही,”अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
गतवर्षी सत्यभामा मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपणाची मुख्यमंत्र्यांनी आवर्जून माहिती घेतली. पंढरपूर मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी शासनाने 73 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत कामांबाबत चर्चा झाली. अशा पद्धतीने निधी देण्याचे जाहीर करून, तो लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल समितीने समाधान व्यक्त केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/560416858969381/
● रुक्मिणी मातेच्या चरणावर चालले अकरा तास वज्रलेपाचे काम
सोलापूर – रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेप प्रक्रिया पूर्ण केले आहे. आषाढी एकादशी पूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे वज्रलेप धरले पूर्ण होणे गरजेचे आहे. मध्यरात्री १२ ते पहाटे ४ या काळात पहिला टप्पाचे काम झाले. तर रविवारी दुपारी १२ ते ७ वाजेपर्यंत चरणांची झालेली झीज भरून काढली. जवळपास ११ तास वज्रलेप करण्यासाठी वेळ लागला आहे आता २ दिवसानंतर भाविकांना रुक्मिणी मातेच पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती दिली आहे.
दोन दिवसांपासून सुरु असलेली देवीच्या मूर्तीवरील वज्रलेपाची प्रक्रिया आज रविवारी दुपारी पूर्ण झाली. वज्रलेपानंतर श्रींचे चरण पूर्ववत झाले आहेत. या रासायनिक लेपनानंतर पुढील दोन दिवस श्री रुक्मिणीमातेचे नित्योपचार आणि पदस्पर्शदर्शन बंद राहणार आहे.
मूर्ती संवर्धनाबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाला या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या.
काल शनिवारी रात्री 11 वाजता लेपन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत लेपनाचे काम सुरु होते. या प्रक्रियेला जवळपास 12 तासांचा अवधी लागला. संभाजीनगर येथील भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही वज्रलेप प्रक्रिया पार पडली. श्री रुक्मिणीमातेच्या चरणांची झालेली झीज व मंदिर समितीने केलेले दुर्लक्ष या बाबीमुळे भक्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
माध्यमांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी तातडीने पंढरपूर गाठत मूर्तीची पाहणी केली. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार श्री रुक्मिणी मातेच्या चरणावर इफोक्सी सिलिकॉन लेप करण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाचे श्रीकांत मिश्रा आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/560391258971941/