बीड : पत्नी ही आयुष्याची साथीदार असते. यमापासून आपल्या पतीचे प्राण सोडवून आणणाऱ्या सावित्रीची उद्याची वटपौर्णिमा आपण साजरी करतो. या वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच बीड मधून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत पत्नीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यातून पूर्ण बीड जिल्हा हादरला आहे. Wife became enemy; On the eve of Vatpoornime, the state shook Beed husband’s one crore insurance
पतीच्या नावे असलेल्या एक कोटीच्या विम्याची रक्कम आपल्याला मिळावी म्हणून पत्नीने एका व्यक्तीच्या मदतीने पतीची हत्या केली. पिंपरगव्हाण रोडवर एक मृतदेह आढळून आला होता. गाडी आणि टेम्पोचा अपघात होऊन तो मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यातून हि हत्या असल्याची शंका पोलिसांना आली. तो मृतदेह मंचक गोविंद पवार (४५, रा. वाला, ता. रेणापूर जि. लातूर, हमु. अंकुशनगर, बीड) याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या डोक्यात वार करण्यात आले होते.
पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर ही हत्या विम्याच्या रकमेसाठी झाल्याचे उघड झाले. नव्वद लाख पत्नीचे आणि दहा लाख मारेकऱ्यांचे अशी सुपारी पत्नीने दिली. पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर पत्नीने आपणच हे कृत्य केल्याचे कबुल केले. पत्नीलाही पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना पत्नींही पतीच्या हत्येची सुपारी दिली असल्याचा कबुली जबाब दिलाय. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याबाबत माहिती देत हत्येचा खुलासा केलाय.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/560573782287022/
उपनिरीक्षक देविदास आवारे यांच्या फिर्यादीवरुन पत्नी गंगाबाई मंचक पवार (३७, रा. वाला, ता. रेणापूर जि. लातूर, हमु. अंकुशनगर, बीड), श्रीकृष्ण सखाराम बागलाने (२७,रा. काकडहिरा ता.बीड ), सोमेश्वर वैजीनाथ गव्हाणे (४७, रा.पारगाव सिरस ता.बीड) व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय.
पोलिसांनी केलेल्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. रस्त्यावर आढळलेल्या मृतदेहाची हत्या करण्यात आलेली. मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आले होते. डोक्यात वार करुन या इसमाचा मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आल होता. त्यानंतर टेम्पो आणि दुचाकीची धडक होऊन अपघात झालाय, असा बनाव रचला गेला होता. यात पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली.
शुक्रवार , १० जून रोजी मंचक पवार हा नित्याप्रमाणे शेतात गेल्यावर त्यांना संपर्क करून या चौघांनी गाठले. आरोपी टेम्पोतून पिंपरगव्हाण शिवारात पोहोचले. तेथे एका झाडाखाली त्यांनी मंचक पवार यांना दारू पाजली व ते स्वत:ही प्यायले. सोमेश्वर गव्हाणे याने त्यांच्या डोक्यात मागील बाजूला व्हिल पाना मारला. रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.
एक कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी मृत पवार यांच्या पत्नीनेच सुपारी देऊन पतीचा काटा काढला होता. पतीच्या हत्येकरीता पत्नीने दहा लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यातील दोन लाख रुपये मारेकर्यांना ऍडव्हान्स म्हणून दिला. अखेर हा कट पोलिसांनी उधळून लावण्यात यश आलंय.
https://www.facebook.com/109399567404448/posts/560566642287736/