Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

National Herald case ईडीकडून राहुल गांधींची 8 तास चौकशी, उद्या पुन्हा बोलावले

8 hours interrogation of Rahul Gandhi from ED, National Herald case called again tomorrow

Surajya Digital by Surajya Digital
June 13, 2022
in Uncategorized
0
National Herald case  ईडीकडून राहुल गांधींची 8 तास चौकशी, उद्या पुन्हा बोलावले
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज ईडीने तब्बल 8 तास चौकशी केली. त्यानंतर आता पुन्हा उद्या (मंगळवारी) राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, आज राहुल गांधी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी जाणार हे कळताच देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसनं अनेक ठिकाणी आंदोलनं केली. 8 hours interrogation of Rahul Gandhi from ED, National Herald case called again tomorrow

 

नॅशनल हेराल्ड संबधित मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आज अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले. काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर सूडाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे आणि म्हटले आहे की, भाजप शासकीय यंत्रणांचा वापर करून आम्हाला बोलण्यापासून थांबवत आहे. पंरतू आम्ही याचा सामना करू आणि लढू पण “माघार घेणार नाही.” अशा शब्दात राहूल गांधीना टीका केली.

आज केंद्राकडून ईडीच्या ‘दुरुपयोगाविरोधात काँग्रेस कार्यकर्ते ‘सत्याग्रह’ करणार होते मात्र, , दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना समन्स करण्याचा ईडीचा निर्णयावर प्रतिक्रिया देत पी. चिदंबरम यांनी सांगितले की, ‘मी काँग्रेस सदस्य आणि वकील म्हणून बोलतो आहे की Prevention of Money Laundering Act अंतर्गत ईडीने पाठवलेले समन्स निराधार आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणामुळे राहुल गांधी यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे. 2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. “यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडने 90.25 कोटी रुपये वसूल करण्याचे अधिकार मिळवण्यासाठी फक्त 50 लाख रुपये भरले होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवा या प्रकरणात आणखी चार जणांना आरोपी करण्यात आले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, पत्रकार सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा अशी या प्रकरणात आरोप करण्यात आल्यांची नावे आहेत. यातील दोन आरोपी मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन झाले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

स्वामी यांनी दाखल केलेल्या दाव्यात काँग्रेस नेत्यांनी कोट्यवधींची मालमत्ता बळकावल्याचा आरोप केला आहे. जून 2014 मध्ये न्यायालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात समन्स जारी केले. यानंतर ऑगस्टमध्ये ईडीने या प्रकरणाची दखल घेत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. सोनिया आणि राहुल गांधी यांना 2015 मध्ये दिल्लीच्या पटियाला कोर्टातून 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळाला होता. त्यानंतर 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोपींना वैयक्तिक हजेरीतून सूट दिली, परंतु या प्रकरणी सुरू असलेली कार्यवाही रद्द करण्यास नकार दिला.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना यापूर्वी दोन जून रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. पण ते विदेश दौऱ्यावर असल्यामुळं त्यांनी ईडीकडं वेळ वाढवून मागितली होती. त्यानंतर ईडीनं त्यांना 13 जूनला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. दुसरीकडे, सोनिया गांधी यांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. कारण त्यांना कोरोनाची लागण झाली असून अद्याप त्या कोरोनामुक्त झाल्या नाहीत.

 

□ नेमके प्रकरण काय ?

 

नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली हे वृत्तपत्र सुरू केले होते. हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ (एजेएल) नावाच्या कंपनीकडे होती. या कंपनीवर सुरुवातीपासून काँग्रेस आणि गांधी घराण्याचे वर्चस्व होते.

तब्बल 70 वर्षांनंतर 2008 मध्ये हे वृत्तपत्र तोट्यात गेल्यामुळे बंद करावे लागले. त्यानंतर काँग्रेसने पक्ष निधीतून एजेएलला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले. मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 2010 मध्ये ‘यंग इंडियन’ नावाची नवी कंपनी स्थापन केली. असोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला कंपनीत 99 टक्के हिस्सा मिळाला. सोनिया आणि राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनीत 38-38 टक्के हिस्सेदारी आहे. बाकीचा हिस्सा मोतीलाल वोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता.

 

 

Tags: #8hours #interrogation #RahulGandhi #ED #NationalHerald #case #calledagain #tomorrow#ईडी #राहुलगांधी #8तास #चौकशी #उद्या #पुन्हाबोलावले #नॅशनलहेराल्ड #प्रकरण
Previous Post

पत्नी झाली वैरीण; वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला राज्य हादरले

Next Post

India wins gold medal सोलापूरच्या रामजी कश्यपने महाराष्ट्र खोखो संघाला मिळवून दिले सुवर्णपदक खेलो इंडिया

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
India wins gold medal सोलापूरच्या रामजी कश्यपने  महाराष्ट्र खोखो संघाला मिळवून दिले सुवर्णपदक खेलो इंडिया

India wins gold medal सोलापूरच्या रामजी कश्यपने महाराष्ट्र खोखो संघाला मिळवून दिले सुवर्णपदक खेलो इंडिया

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697