□ 4 थी खेलो इंडिया खो – खो स्पर्धा
□ रामजी कश्यपवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव !
वेळापूर : भारत सरकार आणि भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ४ थी खेलो इंडिया युथ गेम्स २०२२ पंचकुला, हरियाणा येथे झालेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र खो-खो संघाचा कर्णधार रामजी कश्यप याने जिद्दीने खेळ दाखवून महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. Ramji Kashyap of Solapur Play India wins gold medal for Maharashtra Khokho team
काल सोमवारी पंचकुला हरियाणा येथे झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध आसाम मुलांचा खो-खो सामना झाला. यामध्ये महाराष्ट्र संघाने आसाम संघाचा १ डाव आणि ४ गुणाने पराभव करून सुवर्णपदक मिळवले या सामन्यांमध्ये माळशिरस तालुक्यातील वेळापुरातील अर्धनारीनटेश्वर खो-खो क्लब चा सदस्य व इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी रामजी कश्यप याने १.५५ सेकंद संवरक्षण करून ४ गडी बाद केले व महाराष्ट्र खोखो संघाला विजय मिळवून दिला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/560907008920366/
सदर महाराष्ट्र खो-खो संघाला पंचकुला हरियाणा येथे अखिल भारतीय खो-खो संघटनेचे महासचिव डाॅ. चंद्रजीत जाधव तसेच क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव, क्रीडा मार्गदर्शक सय्यद व्हनकवडे सोलापूर यांचे मार्गदर्शन लाभले. रामजी कश्यप याला अर्धनारी मॅटर खो-खो क्लबचे क्रिडाशिक्षक सतीश कदम, राष्ट्रीय प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे, वेळापुर उपसरपंच जावेद मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले.
रामजी कश्यप खो खो संघाचा कर्णधार याने महाराष्ट्र संघाला सुर्वण पदक मिळवून दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाचे नेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर, वेळापूर सरपंच विमलताई जानकर, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष प्रा. धनंजय साठे, धानोरे सरपंच जीवन जानकर अभिनंदन केले आहे .
——————————————
□ उपमुख्यमंत्री पवारांकडून अभिनंदन
हरयाणामधील पंचकुला येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत अव्वल स्थान राखण्यासाठी महाराष्ट्राच्या टीमनं शर्थीचे प्रयत्न केले. खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ४५ सुवर्णपदकांसह १२५ पदकांची कमाई करत क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची मान उंचावली आहे. सलग तीन वर्षे ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत अव्वल स्थान पटकवणाऱ्या महाराष्ट्राच्या टीममधील प्रत्येक खेळाडूंनी यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत जिगरबाज खेळ करत पदकांबरोबरच देशातील क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. राज्यातील प्रत्येकाला आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान आहे. या यशासाठी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापकांसह त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन!, अशी पोस्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय.
https://www.facebook.com/109399567404448/posts/560825625595171/