Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

घरगुती गॅस कनेक्शन आजपासून 750 रुपयांनी महाग; आता मोजावे लागणार 2200 रूपये

Domestic gas connection expensive by Rs 750 from today; Now you have to pay 2200 rupees

Surajya Digital by Surajya Digital
June 16, 2022
in Hot News, देश - विदेश
0
घरगुती गॅस कनेक्शन आजपासून 750 रुपयांनी महाग; आता मोजावे लागणार 2200 रूपये
0
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली : नवीन घरगुती गॅस कनेक्शनसाठी आता 2200 रुपये द्यावे लागणार आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी ही घोषणा केली आहे. याआधी कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये द्यावे लागत होते. मात्र आता यात 750 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आजपासून (16 जून) ही वाढ लागू होणार आहे. तर दोन सिलिंडरसाठी 4400 रुपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. ग्राहकांना 150 रुपयांऐवजी 250 रुपये रेग्युलेटरसाठी खर्च करावे लागतील. Domestic gas connection expensive by Rs 750 from today; Now you have to pay 2200 rupees

पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये मोजावे लागत होते. पण आता यासाठी तुम्हाला ७५० रुपये अधिक म्हणजेच २२०० रुपये द्यावे लागतील. पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति सिलेंडर ७५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

जर तुम्ही दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला १५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. म्हणजेच, यासाठी तुम्हाला ४४०० रुपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. यापूर्वी यासाठी २९०० रुपये मोजावे लागत होते. कंपन्यांनी केलेला हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे. त्याचप्रमाणे रेग्युलेटरसाठी १५० रुपयांऐवजी २५० रुपये खर्च करावे लागतील.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, ५ किलोच्या सिलेंडरची सुरक्षा रक्कम आता ८०० रुपयांऐवजी ११५० रुपये करण्यात आली आहे. आता नवीन किचन कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकाला 2,200 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी ही रक्कम 1450 रुपये होती. अशाप्रकारे आता सिलिंडरची सुरक्षा म्हणून ७५० रुपये अधिक जमा करावे लागणार आहेत. याशिवाय रेग्युलेटरसाठी 250, पासबुकसाठी 25 आणि पाईपसाठी 150 रुपये वेगळे द्यावे लागतील. त्यानुसार पहिल्यांदा गॅस सिलिंडर कनेक्शन आणि पहिल्या सिलिंडरसाठी ग्राहकाला एकूण 3,690 रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर कोणी दोन सिलिंडर घेतले तर त्याला सुरक्षा म्हणून 4400 रुपये द्यावे लागतील.

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाही या नव्या दरांच्या अंमलबजावणीमुळे धक्का बसणार आहे. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर दुप्पट केल्यास त्यांना दुसऱ्या सिलिंडरसाठी वाढीव सुरक्षा रक्कम जमा करावी लागेल. दरम्यान, नवीन गॅस कनेक्शनसह येणाऱ्या पासबुकसाठी ग्राहकांना २५ रुपये आणि पाईपसाठी १५० रुपये मोजावे लागतील. नवीन कनेक्शनची किंमत सहसा अशा सर्व खर्चाचा समावेश करते. मात्र, गॅस सिलिंडरसह स्टोव्ह घेण्यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.

 

 

Tags: #Domestic #gas #connection #expensive #750 #today #Now #pay #2200 #rupees#घरगुती #गॅस #कनेक्शन #750रुपये #महाग #मोजावे #2200रूपये
Previous Post

नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Next Post

सोलापुरात कारखान्याच्या आवारात मालकाची गळफास घेऊन आत्महत्या

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापुरात कारखान्याच्या आवारात मालकाची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापुरात कारखान्याच्या आवारात मालकाची गळफास घेऊन आत्महत्या

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697