बार्शी : राष्ट्रवादीचे गटनेते नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक विजय राऊत, दिपक धावारे, रणजित चांदणे या तिघांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश जयेंद्र जगदाळे यांनी फेटाळला. Former corporator and three others’ pre-arrest bail rejected in Nagesh Akkalkote murder case barshi
याप्रकरणी फिर्यादी अक्कलकोटे यांच्या वतीने अॅड. अभिजीत कुलकर्णी, अॅड. विकास जाधव, अॅड. अक्षय काशीद यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अॅड. राजश्री कदम यांनी बाजु मांडली
दि. १ ऑगस्ट २०१४ रोजी अक्कलकोटे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ८४/२०१४ अन्वये भा.द.वि. १४३, १४७, १४८, ३०७, ३२९, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४९ व आर्म अॅक्ट २५ (२) प्रमाणे विजय राऊत, दिपक राऊत, सोन्या हाजगुडे, मुन्ना बोते, डंग्या यादव, दिपक धावारे, रणजित चांदणे, प्रकाश राऊत, विशाल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तपासाअंती तत्कालीन तपास अधिकारी सालार चाऊस यांनी विजय राऊत, दिपक धावारे, रणजित चांदणे यांची नावे सी.आर.पी.सी. १६९ प्रमाणे वगळण्याचा अहवाल व इतर आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयाकडे सादर केले होते. त्यास अक्कलकोटे यांनी आव्हान दिल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयश्री राऊत यांनी १६९ चा अहवाल फेटाळुन आरोपी विरोधात प्रोसेस इश्युचे आदेश पारित केले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/561867918824275/
याविरोधात या तिघांनी प्रथम सत्र न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र प्रोसेस इश्यू आदेश कायम राहिला. त्यामुळे या तिघांनी सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्याची सुनावणी सत्र न्यायाधीश जगदाळे यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर अभियोग पक्षाच्यावतीने तिघांच्या अटकेची गरज असल्याचे सांगण्यात आल्यानंतर अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
□ घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर
https://www.facebook.com/109399567404448/posts/561045935573140/