बार्शी : बियाणे विक्री बाबतच्या नियमांचा भंग केल्यामुळे कृषी विभागाने चांगला दणका दिला आहे. बार्शी तालुक्यातील ९ कृषी केंद्रांना बियाणे विक्री बंद करण्याचा आदेश दिला. Department of Agriculture orders closure of sale of seeds to nine agricultural centers in Barshi due to violation of rules
बियाणे विक्री बंद करण्याचा आदेश दिलेल्यामध्ये बार्शी शहरातील २ व वैराग येथील ७ दुकानांचा यात समावेश आहे. जेवढ्या बियाण्याचा साठा आवश्यक कागदपत्र सहित सापडला नाही, तेवढ्याच बियाण्याच्या संदर्भात हा विक्री बंद आदेश आहे. उर्वरित बियाणे कृषी सेवा केंद्र चालक विक्री करू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
खरीप हंगाम पूर्वतयारी झालेली असून शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या बाजारात विविध कंपन्याचे बियाणे विक्रीसाठी दाखल झालेले असून बार्शी व वैराग येथे उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र कांबळे, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी बार्शी व वैराग येथील बियाणे विक्री केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिलेले आहेत.
या कारवाईमध्ये प्रभारी गुणनियंत्रण कृषी पर्यवेक्षक गणेश पाटील यांच्यासह वैराग मंडळचे कृषी पर्यवेक्षक एन बी जगताप, संजय कराळे, भारत महांगडे, रघुनाथ कादे, अण्णा नलवडे इत्यादी उपस्थित होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/563590125318721/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ आमदाराचा महागडा मोबाइल सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या एसी डब्ब्यातून चोरला
सोलापूर : पंचायतराज समितीचे सदस्य आमदार किशोर जोरगेवार दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आले होते. गुरुवारी (ता. 16) सिद्धेश्वर एक्स्प्रेसने जात असताना त्यांचा महागडा मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
याबाबत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली आहे. नेमका मोबाइल कधी चोरीला गेला याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. या प्रकरणी तपास सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिलीय.
सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी माहिती दिली आहे. एसी डब्यातून प्रवास करताना मोबाइल केव्हा आणि कसा चोरीला गेला, याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाही. तपास कार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
● राज्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट
#yellow #Alert #thane #Rayagada #Akola #amravati #nagpur #washim #rain #सुराज्यडिजिटल #surajyadigital #palghardistrict
■ मान्सून महाराष्ट्रात धडकला असला तरी अनेक जिल्ह्यात अजूनही पावस पडला नाही. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. यानुसार 19 ते 21 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/563846421959758/