Monday, July 4, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Agneepath Scheme अग्निपथ – पुन्हा बदल, मोदी सरकारची घोषणा; आतापर्यंतचे सर्वात गोंधळलेले पंतप्रधान

#AgnipathRecruitmentScheme

Surajya Digital by Surajya Digital
June 18, 2022
in Hot News, देश - विदेश
0
Agneepath Scheme अग्निपथ – पुन्हा बदल, मोदी सरकारची घोषणा; आतापर्यंतचे सर्वात गोंधळलेले पंतप्रधान
0
SHARES
54
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली : लष्कराच्या भरतीबाबत असलेल्या अग्निपथ योजनेत गेल्या 3 दिवसात अनेक बदल करण्यात आले आहेत. अग्निपथ योजनेत तयार होणाऱ्या अग्निवीरांसाठी आसाम रायफल्ससहित सगळ्याच निमलष्करी दलांच्या भरती प्रक्रियेत 10% जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. रक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय तटरक्षक दलात अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. याआधी अग्निवीरांसाठी असलेली वयोमर्यादा 21 वरुन 23 वर्षे करण्यात आली. Agneepath Scheme Agneepath – Change again, Modi government’s announcement; The most confused Prime Minister ever

तर दुसरीकडे राष्ट्रवादीने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “पंतप्रधान मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान आहेत अशी जनतेची धारणा होऊ लागली आहे. अनेक मोठ्या योजना आणि धोरणे आणण्याचा उत्साह केंद्र सरकार दाखवत असले तरी प्रत्यक्षात ठोस कृतिशील आखणी नसल्याने अनेकदा या योजनांमध्ये बदल करावे लागले तर अनेक योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत, ” असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

अग्निपथ योजने अंतर्गत भरती होणाऱ्या अग्निवीरांची वयोमर्यादा 21 पर्यंत ठेवण्यात आली होती. ती वाढवून आता 23 करण्यात आलेली आहे. गेल्या दोन वर्षात एकदाही भरती झाली नसल्याने हा बदल केल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. पण, ही बदलेली अट केवळ प्राथमिक वर्षीच लागू असणार आहे. पुढच्या वर्षापासून पुन्हा वयोमर्यादा 21 करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

केंद्र सरकारच्या सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून गुरुवारी तीव्र विरोध झाला. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि हरियाणामध्ये ही योजना मागे घेण्याची मागणी करत तरुण रस्त्यावर उतरले.

 

आंदोलनादरम्यान आंदोलकांनी गाड्या पेटवल्या आणि अनेक ठिकाणी तोडफोडही केली आहे. अग्निपथ योजनेविरोधात निदर्शनाचा आज चौथा दिवस आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये निदर्शनं सुरू आहेत. बिहारमध्ये २२ जिल्ह्यांमध्ये अग्निपथ योजने विरोधात निदर्शनं सुरु आहेत.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या अग्निपथ योजनेविरोधात देशभर हिंसाचार सुरू आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील तरुणांनी या योजनेला विरोध केला. हा वाढता विरोध लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे.

या नव्या निर्णयानुसार, अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी १० टक्के रिक्त जागा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अग्निवीरांना दोन दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा ३ वर्षाची सूट दिली जाणार आहे. तर, अग्निवीरांच्या पहिल्या तुडकीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढे ५ वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल असंही गृह मंत्रालयाने म्हटलंय.

 

दरम्यान, बिहारमध्ये रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. पहाटे 4 ते रात्री 8 या वेळेत कोणतीही ट्रेन धावणार नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये सर्वाधिक हिंसाचार झाला आहे. संतप्त जमावाने डझनभर गाड्या पेटवल्या आणि अनेक शहरे आणि गावांमधील सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले आहे. रेल्वे अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वेच्या मालमत्तेच्या झालेले तोडफोडीमुळे एकट्या बिहारमध्ये 200 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.

बिहारमधील १२ जिल्ह्यांमध्ये १९ जूनपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, देशभरातून अग्निपथ योजनेला विरोध होत असून, याचा सर्वाधिक फटका भारतीय रेल्वेला बसला आहे. आतापर्यंत ३४० गाड्यांवर परिणाम झाल्याने रेल्वेचे ४० कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.

 

 

Tags: #Agneepath #Scheme #अग्निपथ #योजना #पुन्हाबदल #मोदी #सरकार #घोषणा #आतापर्यंत #सर्वात #गोंधळलेले #पंतप्रधान#AgneepathScheme #Agneepath #Change #again #Modi #government's #announcement #most #confused #PrimeMinister
Previous Post

Solapur doctor रोटरीच्या 43 सर्जन्सकडून काश्मीरमध्ये आठ दिवसात २४९९ शस्त्रक्रिया

Next Post

दहावीत कमी मार्क मिळतील या भीतीने सोलापुरात विद्यार्थीनीची आत्महत्या

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
दहावीत कमी मार्क मिळतील या भीतीने सोलापुरात विद्यार्थीनीची आत्महत्या

दहावीत कमी मार्क मिळतील या भीतीने सोलापुरात विद्यार्थीनीची आत्महत्या

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697