सोलापूर : दहावी परीक्षेत कमी गुण मिळतील या भितीने एका विद्यार्थीनीने शेततळ्यात उडी घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोलापुरातील माढा तालुक्यातील घोटी गावात घडली. काल शुक्रवारी (ता. 17) सकाळी उघडकीस आली. Student commits suicide in Solapur for fear of getting less than 10 marks
अमृता दाजीराम लोंढे (वय १७, रा. घोटी, ता. माढा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. दुपारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालात मात्र प्रत्यक्षात तिला ८१ टक्के गुण मिळून ती उत्तीर्ण झाल्याची माहिती पुढे आली. या घटनेनं घोटी गांव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. कमी गुण मिळतील यामुळे ती तणावात होती. आई-वडीलांनीही तिला याबाबत समजावले होते, मात्र कांहीही उपयोग झाला नाही.
अमृताने एप्रिल २०२२ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेत तिला अपेक्षेप्रमाणे गुण मिळणार नाहीत, यामुळे ती तणावात होती. गुण चांगले मिळतील म्हणून घरच्यांनी तिची समजूत काढली होती. गुण कमी मिळाल्यास लोक काय म्हणतील या भीतीने ती वावरत होती. ही गोष्ट तिच्या आई-वडिलांनाही जाणवत होती. अशावेळी तिच्या माता-पित्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही.
गुरूवारी मध्यरात्री ती कुणालाही काही न सांगता ती घराबाहेर पडली. घरात ती दिसत नसल्याने नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. पण, तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. काल शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घरापासून 2 किलोमीटर अंतरावर शिवराम मोहन लोंढे यांच्या शेतातील शेततळ्यात पाण्यावर तिचा मृतदेह तरंगताना आढळला. याबाबत माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/563741891970211/
□ बार मालकाकडे मागितली महिना ५ हजारांची खंडणी
सोलापूर : भवानी पेठेतील सफारी बार मध्ये जाऊन मालकाला महिना ५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करुन तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी ४ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
बाळू कुमार बनसोडे, अक्षय प्रकाश थोरात, संजय गायकवाड, राकेश चंदनशिवे (सर्व रा. न्यू बुधवार पेठ) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी विजय भास्कर सुरवसे (वय ३५, रा. पत्रा तालीम, उत्तर कसबा) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भवानी पेठेतील सफारी बार अन्ड रेस्टॉरंटमध्ये वरील चौघे गेले होते. तेथे चौघांनी दारू, बीअर व चकनाची ऑर्डर दिली. व टेबलवरील रिकाम्या दारूच्या बाटल्या फोडून वेटर अशोक देवगण व विजय यांच्याशी हुज्जत घालून दमदाटी केली. १० हजारांचे नुकसान केले.
बारचे मालक संजय कोळी यांस तुला जर बार चालवायचे असेल तर महिना ५ हजार रुपये दे, अशी खंडणी मागून धमकी दिली. या फिर्यादी वरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जोडभावी पेठ पोलिस करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/563829428628124/
□ आमदाराचा महागडा मोबाइल सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या एसी डब्ब्यातून चोरला
#lost #मोबाईल
#MLA #mobile #thief #सुराज्यडिजिटल #surajyadigital
सोलापूर : पंचायतराज समितीचे सदस्य आमदार किशोर जोरगेवार दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आले होते. गुरुवारी (ता. 16) सिद्धेश्वर एक्स्प्रेसने जात असताना त्यांचा महागडा मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
याबाबत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली आहे. नेमका मोबाइल कधी चोरीला गेला याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. या प्रकरणी तपास सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिलीय.
सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी माहिती दिली आहे. एसी डब्यातून प्रवास करताना मोबाइल केव्हा आणि कसा चोरीला गेला, याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाही. तपास कार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.