सोलापूर : सांगोला – पंढरपूर परिसरातील अट्टल गुन्हेगारांच्या 3 टोळ्यांमधील नऊ जणांना एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. अनेक दिवसांपासून हे पोलिसाच्या नजरेत होते.
Nine persons from Sangola and Pandharpur were deported
Solapur Police
अनिकेत बापूराव काळे, अक्षय विजय इंगोले (रा.वज्राबादपेठ, सांगोला), रविराज दिलीप मस्के (रा. एखतपूर रोड, मस्के कॉलनी, सांगोला), अजिंक्य बिरूदेव माने (रा. धनगर गल्ली, सांगोला), लखन रामचंद्र चव्हाण (रा. सांगोला), शंकर उर्फ बिनू लिंगा भोसले (रा. आंबे, ता. पंढरपूर), विकास अण्णा गोडसे (रा. आंबे, ता. पंढरपूर), महेश जिवाप्पा कोळी (रा. आंबे, ता. पंढरपूर), भैया उत्तम शिंदे (रा. आंबे, ता. पंढरपूर) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक यांनी तडीपारीचे आदेश दिले.
□ अग्निपथ योजनेला सोलापुरातही विरोध; कायद्याच्या चौकटीत राहून दिले निवेदन
सोलापूर : अग्निपथ योजना संदर्भात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांचे पथक सर्वत्र लक्ष ठेवून आहे. दरम्यान शनिवारी दुपारी काही संशयित युवकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले.
अग्निपथ योजनेविरोधात निदर्शने करण्यासाठी सात. रस्ता आणि रेल्वे स्टेशन परिसरात जमलेल्या काही तरुणांना सदर बझार पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर आरपीएफ, लोहमार्ग पोलिस आणि सदर बझार पोलिस यांनी स्टेशन परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. सुमारे शंभर तरुणांना पोलिसांनी सदर बझार पोलीस ठाण्यात आणले. त्यांना समजावून सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कायद्याच्या चौकटीत राहून आपले म्हणणे मांडा, असे सांगितले. ५ तरुणाना सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त लावला होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमोल गवळी म्हणाले, काही तरुणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्टेशन परिसरात बंदोबस्त होता, असे त्यांनी सांगितले. पोलिस, सैन्य भरतीसाठी तयारी करणारे शहर व जिल्ह्यातील १०० हून अधिक तरुण यात सहभागी होते. माळशिरस, बार्शी, अक्कलकोट, करमाळा, सोलापर शहर येथून तरुण आले होते.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या अग्निपथ या योजनेला आता संपूर्ण देशभरात विरोध होऊ लागला आहे. बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागात आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. रेल्वेगाड्या जाळल्या जात आहेत. अग्निपथ ही चार वर्षासाठी भारतीय सैन्यातील भरती म्हणजे आयुष्यभराची बेरोजगारी आहे, अशी मानसिकता लोकांची झाली आहे.
□ महापालिकेने निश्चित केलेले दर जलतरणपटूकडून घ्यावेत
सोलापूर : महापालिकेच्या ताब्यातील मार्कंडेय व सुंदरमनगर येथील जलतरण तलाव चालवण्यासाठी वार्षिक ३१ लाख रुपयांचा मक्ता निश्चित केला आहे. याशिवाय पार्क येथील सावरकर जलतरण तलावास २० लाख रुपये दर असे एकूण ५१ लाखांस तीन तलाव चालवण्यासाठी देण्यात येणार आहे.
यासाठी करार महापालिका करेल अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. महापालिकेने निश्चित केलेले दर जलतरणपटूकडून घ्यावेत, असे करारात नमूद करण्यात आले आहे. कोरोना काळात तलाव बंद होते, पण पास काढलेल्यांना मुदतवाढ देण्यात येणार आहे.