सातारा : कोल्हापूरवरून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला आहे. प्रवासादरम्यान एका टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला तर 30 वारकरी जखमी झाले आहेत. जखमी वारकऱ्यांना साताऱ्यातील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला. One killed, 30 injured in Warakaria tractor accident Satara Pandharpur Kolhapur
दोन वर्षाच्या अंतराने वारी होत असल्याने वारकऱ्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सगळ्यांनाच ज्ञानोबाच्या पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे त्यासाठी निघालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांवर काळाने झडप घातली आहे. सातारा- पुणे महामार्गावरील शिरवळ येथे दिंडीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने जोराची धडक दिली. यात एका वारकरीचा जागीच मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत.
यातील 11 वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत. मायप्पा कोंडिबा माने (वय 45) असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. तर मारूती भैरवनाथ कोळी (वय 40) मृत्यूशी झुंज देत आहेत. हा अपघात आज रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराही ही दुर्दैवी घटना घडली. कोल्हापूरचे एक रहिवासी मारुती कोळी नावाची व्यक्ती जखमी झाल्याचीही माहिती मिळतेय. इतर जखमींची नावं अद्याप कळू शकलेली नाहीत. आळंदीला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यासाठी आळंदीला जायला हे वारकरी निघाले होते. मात्र वाटेतच काळानं एका वारकऱ्यांवर घाला घातलाय. तर थोडक्यात अन्य वारकरी बालंबाल बचावले आहेत. सध्या जखमी वारकऱ्यांवर उपचार केले जात आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/564568545220879/
कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले लोहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी पंढरपूरला पायी वारीसाठी आळंदी ते पंढरपूर निघाली होती. ही दांडी शिरवळ खंडाळा गावाच्या हद्दीत पोहचताच आयशर ट्रकने पाठीमागून वारकऱ्यांच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. यावेळी ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडल्या होत्या.
यामध्ये महिलांसह 43 वारकरी ट्रँक्टर ट्रॉलीमध्ये प्रवास करत होते. मात्र अचानक झालेल्या या अपघातामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर आयशर ट्रक पलडी झाला. यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले वारकरी बाहेर फेकले गेले. तर ट्रॉलीचा पाठीमागच्या बाजूने चक्काचूर झाला आहे.
या अपघातात तीस वारकरी गंभीर तर अकरा वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी जखमींना तातडीने युवक आणि नागरिकांच्या मदतीने शिरवळ पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील खाजगी आणि सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अपघातातील गंभीर जखमी मारुती कोळी यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या घटनेची नोंद घेत पोलिसात झाली असून पुढील तपास सुरु केला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/564321058578961/