सोलापूर : अजित उंब्रजकर
आगामी महापालिका निवडणुकीत शहर उत्तर बरोबरच दक्षिण विधानसभा मतदारसंघातील २८ जागांसाठी आ. सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने या दोन नेत्यांमध्ये जोरदार टशन पहायला मिळणार आहे. निवडणूक महापालिकेची मात्र रंगीत तालीम विधानसभेची असंच काहीसं चित्र असून वर्चस्वाची दिसून येत आहे. Election of Municipal Corporation, however, colorful training of Vidhan Sabha; Subhash Deshmukh Dilip Mane of Talim Assembly, Battle Dominance
निवडणुकीमध्ये दक्षिणमधील २३ पैकी १२ जागा निवडून आणत आ. देशमुख यांनी माने यांच्यावर मात केल्याचे दिसून आले. यंदाही आ. देशमुख हा चमत्कार करणार की दिलीप माने त्यांना जड जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकंदरित ही निवडणूक महापालिकेची असली तरी याकडे आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिली जात आहे. मागील
२०१७ च्या महापालिकेत दक्षिणमध्ये २२ नगरसेवक होते. त्यापैकी भाजपचे १२, काँग्रेसचे ६ तर राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी दोन तर एमआयएमचा एक नगरसेवक निवडून आला होता. गतवेळी दिलीप माने काँग्रेस पक्षात होते. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्येच खरी लढाई दिसून आली. आता दिलीप माने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माने गटाचे नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये जाणार यात कोणतीही शंका नाही.
दिलीप माने हे राष्ट्रवादीमध्ये जाताना काही प्रभागातील उमेदवार त्यांच्या पसंतीने ठरवण्याचा शब्द घेऊन जाणार असल्याचे बोलले जात आहे. माने गटाकडून प्रभाग ३५, ३७ आणि ३८ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरल्याचीही माहिती आहे. गतवेळी दक्षिणमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार होते, यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे आ. सुभाष देशमुख हे गेल्या वेळेपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची हजेरी दिसून येत आहे. सध्या त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांच्याकडे त्याचे नियोजन देण्यात आले आहे. यंदा दक्षिणमध्ये भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी देताना आ. देशमुख यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
आताच कोणाला कामाला लागा असे सांगून सर्वांची नाराजी ओढावून न घेण्याची दक्षता आ. देशमुख यांनी बाळगल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत आ. देशमुख यांनी कोणालाही शब्द दिलेला नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवून ते आपले उमेदवार निवडणार यात शंका नाही. ऐनवेळी ते आपले पत्ते ओपन करतील, असे बोलले जात आहे. दक्षिणमधून अनेक प्रभागात आ. देशमुख सर्वांना अनपेक्षित असे उमेदवार ऐनवेळी काढणार असल्याचे समजते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/564375665240167/
□ जुळे सोलापुरात होणार आरपारची लढाई
दक्षिण मतदार संघातील जुळे सोलापूर भाग हा प्रामुख्याने भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. येथील बहुतांश भागात सुशिक्षित मतदार आहेत. त्यामुळे येथून भाजपला विजय सोपा जातो, असे आतापर्यंत दिसून आले आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जुळे सोलापूर भागात तगडे उमेदवार देण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे या भागात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात आरपारची लढाई पाहायला मिळणार आहे.
□ काँग्रेस- सेनेपुढे खडतर आव्हान
दिलीप माने हे राष्ट्रवादीत गेल्यामुळे काँग्रेसला या भागात मोठी कसरत करावी लागणार आहे. आ. प्रणिती शिंदे, शहाराध्यक्ष प्रकाश वाले यांचे अद्याप दक्षिणमधील प्रभागांकडे लक्ष नाही. त्यामुळे दक्षिणमधील सर्व प्रभागात काँग्रेसला उमेदवार मिळणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचीही परिस्थिती याहून वेगळी नाही.
गतवेळी त्यांचे दक्षिणमध्ये केवळ दोन नगरसेवक निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत त्यांची कामगिरी फारशी उंचावणार नाही, असे बोलले जात आहे. दक्षिणमध्ये सेनेचे नेतृत्व करणार कोण असा प्रश्न पक्षापुढे आहे. त्यामुळे दक्षिणमध्ये काँग्रेस आणि सेनेपुढे खडतर आव्हान असणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/564350971909303/
□ नियमभंगामुळे बार्शीतील नऊ कृषी केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश
बार्शी : बियाणे विक्री बाबतच्या नियमांचा भंग केल्यामुळे कृषी विभागाने चांगला दणका दिला आहे. बार्शी तालुक्यातील ९ कृषी केंद्रांना बियाणे विक्री बंद करण्याचा आदेश दिला.
बियाणे विक्री बंद करण्याचा आदेश दिलेल्यामध्ये बार्शी शहरातील २ व वैराग येथील ७ दुकानांचा यात समावेश आहे. जेवढ्या बियाण्याचा साठा आवश्यक कागदपत्र सहित सापडला नाही, तेवढ्याच बियाण्याच्या संदर्भात हा विक्री बंद आदेश आहे. उर्वरित बियाणे कृषी सेवा केंद्र चालक विक्री करू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
खरीप हंगाम पूर्वतयारी झालेली असून शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या बाजारात विविध कंपन्याचे बियाणे विक्रीसाठी दाखल झालेले असून बार्शी व वैराग येथे उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र कांबळे, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी बार्शी व वैराग येथील बियाणे विक्री केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिलेले आहेत.
या कारवाईमध्ये प्रभारी गुणनियंत्रण कृषी पर्यवेक्षक गणेश पाटील यांच्यासह वैराग मंडळचे कृषी पर्यवेक्षक एन बी जगताप, संजय कराळे, भारत महांगडे, रघुनाथ कादे, अण्णा नलवडे इत्यादी उपस्थित होते.