Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

‘बलराज’ अश्वाचे अकलूजहून श्री क्षेत्र देहूकडे प्रस्थान; 40 वर्षापासून प्रतापगडाचा मान

Departure of 'Balraj' horse from Akluj to Shri Kshetra Dehu; Pratapgad's Man Ashadhiwari for 40 years

Surajya Digital by Surajya Digital
June 20, 2022
in Hot News, सोलापूर
0
‘बलराज’ अश्वाचे अकलूजहून श्री क्षेत्र देहूकडे प्रस्थान; 40 वर्षापासून प्रतापगडाचा मान
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अकलूज : संपूर्ण महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागले आहेत. गेले दोन वर्षे कोरोनामुळे शेकडो वर्षांची वारीची परंपरा  खंडित झाली होती. पालखी सोहळा रद्द झाला होता.मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात वारी भरत आहे. Departure of ‘Balraj’ horse from Akluj to Shri Kshetra Dehu; Pratapgad’s Man Ashadhiwari for 40 years

लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचा अश्व (बलराज) रविवारी ( दि.19) पद्मजादेवी मोहिते पाटील यांचे हस्ते विधिवत पूजा करून श्री क्षेत्र देहूकडे रवाना करण्यात आला.

यावेळी माहिती देताना पद्मजादेवी प्रतापसिंह मोहीते पाटील म्हणाल्या, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे पालखी सोहळ्यात सामील होण्यासाठी दरवर्षी अश्व पाठवला जातो. लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या पश्चात डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे.

गेली दोन वर्ष कोरोना व्हायरसमुळे वारी सेवेसाठी अश्व पाठवु शकलो नाही, परंतु यावर्षी मोठ्या उत्साहात अश्व पाठवला आहे. दरवर्षी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज  पालखीसाठी अकलूजवरुन अश्व श्री क्षेत्र देहूकडे रवाना होतो. या वर्षी महाराणा प्रताप यांचे “चेतक” या अश्वाचा वंशज असलेल्या संपूर्ण भारतातील सर्वोकृष्ट अशा  “जयराज” या अश्वाचा वंशज असलेला  “बलराज” हा अश्व या सोहळ्यात सहभागी होणार आहे.

संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात रिंगणाच्या अश्वसेवेची जबाबदारी मोहिते पाटलांकडे असते. मानाच्या रिंगण सोहळ्यात मोहिते पाटलांचा अश्व भगवी पताका घेऊन धावतो. गेल्या 40  वर्षांपासून मोहिते पाटील परिवाराकडून ही सेवा सुरु आहे. देहु ते पंढरपूर पालखी सोहळ्यात अश्व रिंगणासाठी मानाचे बाभूळकरांचे अश्वाबरोबर पताका धारी अश्वसेवेचा  मान लोकनेते प्रतापसिंह मोहीते पाटील यांच्या अश्वाला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

अश्वाला वारीला पाठवण्यापूर्वी एक महिना अगोदर तयारी केली जाते. दररोज सराव घेतला जातो. दररोज तेलाने मालीश केली जाते, दररोज विशेष खुराख दिला जातो. पालखी सोहळ्याचे एक दिवस अगोदर अश्वाची विधिवत पूजा करुन श्री क्षेत्र  देहुकडे अश्व रवाना केला जातो.

यावेळी माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब इनामदार, सतीश पालकर, अण्णासाहेब शिंदे, सुधीर रास्ते, नवनाथ साठे, रणजित देशमुख, राजाभाऊ गुळवे, धनाजी साखळकर, मयुर माने, संजय गाडे, विकास शिंदे, सतीश साठे, जुल्कर शेख, राजाभाऊ निकाळजे, विठ्ठल माने, स्वराज पालकर, नेताजी काळकुटे, वैभव गायकवाड, हसन शेख, संग्राम भोसले, निखिल फुले फिरोज देशमुख, जयसिंग मोरे, रघुनाथ साठे, मंगेश साठे, विजय सांळुखे उपस्थित होते.

 

 

■ पंढरपूर वारीनिमित्त विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा ४ जुलै ते १२ जुलैदरम्यान होणार होत्या. परंतु, पंढरपूर आषाढी वारीमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा ७ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

 

गेल्या मार्च – एप्रिल २०२२ यासत्र हंगामातील सर्व विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा २० जून ते ६ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. तसे अंतिम वेळापत्रकही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु, जुलै महिन्यामध्ये आषाढी एकादशी आहे.

 

त्यामुळे ४ जुलै ते १२ जुलैदरम्यान कोणत्याही परीक्षाचे आयोजन करू नये, असे वारी मार्गावरील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून विद्यापीठास विनंती करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेदरम्यान गैरसोय होऊ नये, याची खबरदारी घेतली आहे. यासाठी सर्व विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ४ जुलै ते १२ जुलै या कालावधीत होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

 

 

Tags: #Departure #Balraj #horse #Akluj #ShriKshetra #Dehu #Pratapgad's #Man #Ashadhiwari #Examination #University #40years#बलराज #अश्व #अकलूज #श्रीक्षेत्र #देहू #प्रस्थान #40वर्षापासून #प्रतापगड #मान #आषाढवारी #परीक्षा
Previous Post

बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप, शिवसेना वर्धापनदिनी राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य

Next Post

अल्पवयीन तरुणीवर बलात्कार; विवाहित तरुण आणि तिच्या पत्नी विरुद्ध गुन्हा

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
अल्पवयीन तरुणीवर बलात्कार; विवाहित तरुण आणि तिच्या पत्नी विरुद्ध गुन्हा

अल्पवयीन तरुणीवर बलात्कार; विवाहित तरुण आणि तिच्या पत्नी विरुद्ध गुन्हा

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697