सोलापूर – ओळखीने घरात येणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच विजापूर नाका परिसरात उघडकीस आली. यात विवाहित तरुण आणि तिच्या पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. Rape of a minor; Crimes against a married young man and his wife
या प्रकरणात विजापूर नाका पोलीसांनी अजय मोहन गायकवाड (वय ३२) आणि या कामासाठी मदत करणारी त्याची पत्नी हर्षदा गायकवाड (वय २६ दोघे रा.हत्तुरेवस्ती, विमानतळ जवळ) यांच्याविरुद्ध बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
विजापूर नाका परिसरात राहणारी ती तरुणी आई-वडिलांच्या परिचयातील गायकवाड दाम्पत्याच्या घरी येत होती. अजय गायकवाड हा मोबाईल रिपेरिंगचे काम करीत असून मुलगी त्याला काका म्हणून संबोधत होती. अजयने तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्या सोबत प्रेमाचे नाटक सुरू केले.
माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत जानेवारी २००२ मध्ये स्वतःच्या घरात तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला होता. दोघांचे प्रेमाचे नाटक समजल्यानंतर अजयची पत्नी हर्षदा ही त्या मुलीस घरात येण्याच विरोध केली. मोबाईल रिपेरिंग साठी पुन्हा ती मुलगी घरी आली होती. तेव्हापासून हर्षदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत होती. तिला आपल्या पतीसोबत नीट रहा असे सांगत होती.
अजय गायकवाड याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत राहिला. दरम्यान अजयने आपला विवाह झालेला असताना पुन्हा पिडीतेसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. हा प्रकार मुलीच्या घरी समजला. त्यानंतर पिडीत मुलीने विजापूर नाका पोलिसात अजय गायकवाड आणि त्याची पत्नी हर्षदा या दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/565078858503181/
□ उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
सोलापूर – एका उच्चशिक्षित मागासवर्गीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी वसीम नबीलाल शेख (वय ३५ रा. कुमठे ता. दक्षिण सोलापूर) याच्याविरुद्ध सदर बझारच्या पोलिसांनी बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.
वसीम शेख हा त्या तरुणीसोबत २०१५ पासून प्रेम करीत होता.लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला होता .त्यानंतर त्याने आमच्या समाजात प्रेम विवाह चालत नाही असे म्हणून तिला लग्न करण्यास नकार दिला. शिवाय याची वाच्यता केल्यास तुला जिवे ठार मारतो, अशी धमकी त्याने दिली. या संदर्भात त्या तरुणीने नुकतीच सदर बाजार पोलिसात फिर्याद दाखल केली. महिला पोलीस निरीक्षक भोसले पुढील तपास करीत आहेत.
□ अपघातामधील जखमीचा मृत्यू
दुचाकी वरून घसरून जखमी झालेले अशोक विठ्ठल बाबर (वय ३५ रा. कोर्टी ता. पंढरपूर) हे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना शनिवारी (ता. 18) मरण पावले. १७ जून रोजी रात्रीच्या सुमारास ते कराड रोड वरून घराकडे निघाले होते. महादेव मंदिरा जवळील दगडी पुला जवळ दुचाकी घसरल्याने ते जखमी झाले होते. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/565059858505081/