नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. त्यासाठी भाजपने द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी तृणमुल काँग्रेसचे यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. Presidential Election: Draupadi Murmu from BJP and Yashwant Sinha from Opposition
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही माहिती दिली आहे. त्या आदिवासी आहेत. झारखंडच्या राज्यपाल म्हणून मुर्मू यांनी काम केले आहे. तर दुसरीकडे यशवंत सिन्हा यांना विरोधी पक्षांनी उमेदवार केले आहे. एकूणच आकडेवारी पाहिल्यास द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित समजला जात आहे.
आज मंगळवारी संध्याकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर मुर्मू यांच्या नावावर एकमत झाले. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाचे सर्व बडे नेते उपस्थित होते.
द्रौपदी मुर्मू या ओडिशा राज्यातील एका आदिवासी कुटुंबातून येतात. ओडिशामध्ये एक आदिवासी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्या झारखंडच्या सलग पाच वर्ष राज्यपाल राहिलेल्या पहिल्याच महिला होत्या. बिजू जनता दल आणि भाजप सरकारमध्ये वाणिज्य खातं सुद्धा त्यांनी सांभाळलं होतं. मुर्मू यांना भाजपच्या नेतृत्वातील NDA ने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित केले आहे. त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि संसदीय मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.
दुसरीकडे विरोधी पक्षांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून सिन्हा यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. २९ जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/565973781747022/
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए संख्याबळाच्या आधारावर भक्कम स्थितीत असून, बीजेडी किंवा आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेससारख्या पक्षांचा पाठिंबा मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित होईल, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
झारखंडच्या नवव्या राज्यपाल असलेल्या ६४ वर्षीय द्रौपदी मुर्मू या मूळच्या ओडिशातील मयूरभंजच्या आहेत. ओडिशातील रायरंगपूरमधून त्या आमदार झाल्या आहेत. राज्यपाल बनलेले ते पहिले ओडिया नेते आहेत. याआधी २००२ ते २००४ या काळात त्या भाजप-बीजेडी युती सरकारमध्ये मंत्रीही होत्या. मुर्मू या झारखंडच्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपालही आहेत.
आज विरोधी पक्षाची बैठक पार पडली. पक्षांतील नेत्यांच्या चर्चेनंतर यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे. यशवंत यांच्या नावाला १९ पक्षांनी समर्थन दिले आहे. विरोधी पक्षाच्या बैठकीला जयराम रमेश, सुधींद्र कुलकर्णी, दीपंकर भट्टाचार्य, शरद पवार, डी राजा, तिरुची शिवा , प्रफुल्ल पटेल, येचुरी, एनके प्रेमचंद्रन, मनोज झा, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला, हसनैन मसूदी, अभिषेक बॅनर्जी आणि राम गोपाल यादव या बैठकीला उपस्थित होते. याशिवाय या बैठकीला ओवैसी पक्षाचे खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी यशवंत सिन्हा यांनी सकाळी ट्वीट करत ‘तृणमूल काँग्रेसमध्ये मला सन्मान आणि प्रतिष्ठा दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत.
माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरवले आहेत. सिन्हा यांचे नाव निश्चित झाल्यावर त्यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. 27 जून रोजी सकाळी 11.30 वाजता आम्ही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत विरोधकांच्या बैठकीत दिली.
यशवंत सिन्हा यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1937 रोजी बिहारमधील पाटणा येथील सामान्य कुटुंबात झाला. तब्बल अडीच दशके भारतीय प्रशासकीय सेवेत राहिल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजकारणात प्रवेश पाऊल ठेवलं. 1986 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना पक्षाचे सरचिटणीसपद देण्यात आले. 1988 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले.
पुढे 1989 मध्ये त्यांच्या पक्षाची जनता दलाशी युती झाल्यानंतर त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवण्यात आले. 1990-91 मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्रीपदही भूषवले होते. त्यानंतर 1998 ते 2002 पर्यंत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. 2002 मध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे पदही भूषवले होते. यशवंत सिन्हा यांनी 2009 मध्ये भाजपच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 2018 मध्ये भाजप सोडल्यानंतर ते 2021 मध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील TMC मध्ये सामील झाले.
1960 मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली. त्यांनी 24 वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. यादरम्यान त्यांनी बिहार सरकारच्या वित्त मंत्रालयात सचिव आणि उपसचिव म्हणून दोन वर्षे काम केले. यानंतर त्यांची भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात उपसचिव पदावर नियुक्ती झाली. यशवंत सिन्हा यांनी त्यांच्या कार्यकाळात भारतीय दूतावासातील महत्त्वाची जबाबदारीही सांभाळली. 1971 ते 1974 या काळात त्यांची जर्मनीतील भारतीय दूतावासाचे प्रथम सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
https://www.facebook.com/109399567404448/posts/565802598430807/