मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मोठ्या प्रतिक्रिया राज्यात उमटत आहेत. भाजपचे जयकुमार गोरे यांनी यंदाच्या आषाढी वारीला देवेंद्र फडवणीस हेच मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करणार असल्याचे भाकित वर्तविले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असून ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. Devendra Fadnavis will worship Panduranga on Ashadhi Politics Pandurpur
विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे, मंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबरची साथ सोडून हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत सत्ता स्थापन करा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर ठेवण्यात आला. भाजपचे साताऱ्यातील आमदार जयकुमार गोरे यांनी एक वेगळेच भाकीत केले आहे. आषाढीला फडणवीस पांडुरंगाची पूजा करतील, असे भाकीत केलंय.
साताऱ्याचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपपुरस्कृत सरकार अस्तित्वात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत 35 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत सरकार स्थापन करावे असा प्रस्तावही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवल्यानंतर साहजिकच भाजपमधील इतर नेत्यांना आता भाजप सरकार स्थापन करू शकते असा विश्वास प्राप्त झाला आहे. त्यामुळे साताऱ्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी मविआचे सरकार कोसळण्याआधीच आषाढीची पंढरपुरातील पूजा देवेंद्र फडणवीस करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
आषाढी एकादशी १० जुलै रोजी आहे. त्याआधीच राज्यात सत्तांतर होण्याची शक्यता जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात काय होईल याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/565978058413261/
जयकुमार गोरे म्हणाले की “सरकार अस्थिर झालंय की नाही यावर माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की, देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.” ते कधी मुख्यमंत्री बनतील असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जयकुमार गोरे म्हणाले, “खूप वेळ नाही. लवकरच आपल्याला बातमी येईल आणि यंदाची आषाढीची पूजा फडणवीस करतील.”
□ एकनाथ शिंदेंनी कोणताही प्रस्ताव पाठवला नाही – पाटील
सरकार स्थापन करण्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी कोणताही प्रस्ताव पाठवला नाही, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असून ते सध्या काही आमदारांसोबत सूरतमध्ये असल्याचे वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पण राजकारणात काहीही आणि कोणत्याही वेळी घडू शकते, असे पाटील यांनी म्हटले आहे.
□ एकनाथ शिंदेंचे शिवसेनेला तीन प्रस्ताव
बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला तीन प्रस्ताव दिले आहेत. 1. सरकारमधून बाहेर पडा, 2. भाजपसोबत सरकार स्थापन करा, 3. गटनेता मीच राहणार असे प्रस्ताव शिंदेंनी दिले आहेत. एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक हे पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशातच एकनाथ शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
□ एकनाथ शिंदेंच्या आधी या नेत्यांनी शिवसेनेसोबत केले बंड
एकनाथ शिंदे यांनी आज बंड पुकारले आहे. ते शिवसेनेतून बाहेर पडतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ते सुरतमधील एका हॉटेलमध्ये आहेत. दरम्यान याआधी राज ठाकरे, नारायण राणे, भास्कर जाधव, गणेश नाईक, छगन भुजबळ, संजय निरुपम, बाळा नांदगावकर, सुरेश प्रभू, तुकाराम रेंगे पाटील, कालिदास कोळंबकर, विजय वडेट्टीवार, राजन तेली, प्रवीण दरेकर, अशा अनेक नेत्यांनी याआधी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला आहे.
□ शिवसेनेमधील आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड
* पहिलं बंड छगन भुजबळांचं- 1991 साली भुजबळांनी शिवसेना सोडली. मनोहर जोशींना विरोधी पक्षनेतेपद दिल्यानं भुजबळ नाराज होते. 1991 च्या नागपूर अधिवेशनात भुजबळांनी 9 आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
* दुसरं बंड नारायण राणेंचं- 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली.
* तिसरं बंड राज ठाकरेंचं- नोव्हेंबर 2005 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/565802598430807/