Monday, February 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

भाजपसोबत सरकार बनवा, तरच परत येईल, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना फोन

Form a government with BJP, only then will it come back, Eknath Shinde calls Uddhav Thackeray politics

Surajya Digital by Surajya Digital
June 21, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
भाजपसोबत सरकार बनवा, तरच परत येईल, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना फोन
0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. भाजप सोबत जाणार असाल तर सत्तेत राहू, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना दिला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे शिवसेनेतील जवळपास 30 आमदारांना घेऊन सुरतमधील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. Form a government with BJP, only then will it come back, Eknath Shinde calls Uddhav Thackeray politics

अशातच आता आम्हाला सुरतमधून बाहेर काढा, अशी मागणी एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून केली आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय. नाराज एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर सुरतमध्ये पोहोचले होते. एकनाथ शिंदे 21 आमदारांना घेऊन सुरतमधील हॉटेलमध्ये थांबले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे एकच शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. अखेरीस एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे सुरतमध्ये पोहोचले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी हॉटेलवर जाऊन शिंदे यांची भेट घेतली. पण एकनाथ शिंदे यांची घातली की, थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या मनातील खदखद आता बाहेर येताना दिसत आहे. त्यांनी एकाच ट्विट मधून तीन वेगवेगळ्या पध्दतीने पक्षाला इशाराच दिला आहे. आपण शिवसैनिक आहोत पण ते बाळासाहेबांचे असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री यांना अलगद बाजूला सारले आहे. बाळासाहेबांनी आपल्याला हिंदुत्वाची शिकवण दिल्याचे सांगत आता त्या शिवकणीचा विसर पक्षाला पडत आहे.

म्हणूनच हा निर्णय घेतल्याचेही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. शिवाय आपल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव असल्याचे सांगत आतान निर्णयापासून माघार नाहीच असा इशाराच त्यांनी पक्षाला दिला आहे की काय असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, एका ट्विटने नाराज एकनाथ शिंदे यांनी आपली सर्व भूमिकाच मांडली असून हे पक्षाला विचार करायला लावणारी आहे.

आमदारांच्या कुटुंबियांनी तक्रार केल्याचे संजय राऊत म्हणाले. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या तत्नीने तक्रार केली आहे.त्यांचे अपहरण करुन त्यांना सूरतला नेण्यात आले आहे आणि त्यांच्या जिवाला धोका आहे. आतापर्यंत अशा 9 आमदारांच्या कुटुंबियांनी तक्रारी केलेल्या आहेत. हे असेच चालू राहिले तर मुंबई पोलिसांना याबाबत कठोर अॅक्शन घ्यावी लागेल हे सगळ्यांना माहिती आहे, असा इशरा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

 

□ एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपर्क झाला, महाष्ट्रात मध्यप्रदेश सारखा पॅटर्न चालणार नाही : संजय राऊत

 

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्यामुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेतील 11 आमदारांसोबत त्यांनी सुरतच्या ल मेरेडिअन हॉटेलमध्ये तळ ठोकला असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला आहे. काही आमदारांना घेराबंदी करून गुजरातमध्ये ठेवण्यात आले आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

विधानपरिषदेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीतून खदखद बाहेर येत आहे.फडणवीसांनी पाचही जागा निवडून आणल्याने राज्यात घडामोडींना मोठा वेग आला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून मुक्काम हालवला असून त्यांनी गुजरातमध्ये आश्रय घेतला असल्याचे समोर आले आहे. ते आज पत्रकार परिषदही घेणार असल्याचं समोर आल आहे.

यातच आता संजय राऊत  यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. तर त्या वेळी बोलताना राऊत म्हणाले की, सेनेचा एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला आहे. मात्र शिंदे आणि सेनेमध्ये काय बोलणं झालं आहे ते अध्याप समोर आलेलं नाहीये. महाष्ट्रात मध्यप्रदेश सारखा पॅटर्न चालणार नाही असंही यावेळी राऊत म्हणाले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत देखील आमचा संपर्क सुरु आहे. स्वत:ला किंगमेकर समजणाऱ्या सरकार आम्हाला कमजोर करू शकणार नाही. आमच्या आमदारांना गुजरामध्ये अडकवून ठेवले आहे, आमचे शिवसैनिक निष्ठावंत आहेत ते आमच्या कडे परत येतील अस राऊत पुढे म्हणाले.

आमचे शिवसैनिक आमच्याकडे परत येतील असेही राऊत म्हणाले. राज्यात कोणत्याही प्रकारचा भूकंप होणार नाही असेही राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे राऊत म्हणाले.

काही गैरसमजातून त्यांनी गुजरातला नेण्यात आलं असल्याचे राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेसुद्धा मुंबईच्या बाहेर आहेत. त्यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क झाला आहे. जे चित्र बाहेर निर्माण केलं जात आहे की भूकंप होईल किंवा अन्य काही होईल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झालं आहे, ते लवकरच दूर होईल असे राऊत म्हणाले. आता आम्ही वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात आहोत. त्यांच्यासोबत बैठक होणार असल्याचं राऊतांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत संपर्क झाल्याचेही राऊत म्हणाले. दरम्यान, भाजपचा घाव हा छातीवर नसून पाठीवर असल्याचे राऊत म्हणाले.

 

□ आमदार फुटतील अन भाजपचे सरकार येणार, एकनाथ शिंदेंच्या गुरूचा दावा

नाशिक – राज्यातील २२ आमदार फुटतील आणि राज्यात लवकरच भाजपाचे मंत्रिमंडळ स्थापन होईल, असा दावा जामनगर सौराष्ट्र येथील जगद्गुरू सुर्याचार्य कृष्णादेवनंद गिरीजी महाराज यांनी आज केला आहे.

आज सकाळी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे १७ आमदारांसह नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांचे गुरू असल्याचा दावा करणाऱ्या कृष्णदेवनंद यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे भाजपाचे सरकार यावे आणि सर्व आमदार सुरक्षित राहावे यासाठी श्री त्र्यंबकेश्वर येथे अभिषेक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी समर्थ रामदास स्वामी यांनी अभिषेक केला त्यानुसार आपण अभिषेक करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

 

》》वर्षा बंगल्यावर उपस्थित आमदार

 

०१) वैभव नाईक ०२) दिवाकर रावते ०३) उदयसिंग राजपूत ०४) विनायक राऊत ०५) नरेंद्र दराडे ०६) अनिल देसाई ०७) विकास पोतनीस ०८) विनायक राऊत ०९) सुभाष देसाई १०) वरून सरदेसाई ११) अरविंद सावंत १२) किशोर दराडे १३) किशोर साळवी १४) आमशा पाडवी १५) चंद्रकांत रघुवंशी १६) रवींद्र वायकर १७) गुलाबराव पाटील १८) संजय राऊत १९) नीलमताई गोरे २०) दादा भुसे २१) सचिन अहिर २२) सुनील शिंदे २३) संजय राठोड २४) सचिन पडवळ २५) अंबादास दानवे २६) मंगेश कुडाळकर २७) प्रकाश फातर्पेकर २८) राहुल शेवाळे २९) राहुल पाटील ३०) सुनील प्रभू ३१) दिलीप लांडे ३२) उदय सामंत ३३) राजन साळवी

 

 

Tags: #Form #government #BJP #only #comeback #EknathShinde #calls #UddhavThackeray #politics#भाजप #सरकार #बनवा #परत #एकनाथशिंदे #ठाकरे #फोन #राजकारण
Previous Post

आ. नितीन देशमुख गुजरातच्या रुग्णालयात दाखल, पत्नीची पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार

Next Post

Devendra Fadnavis आषाढीला फडणवीस पांडुरंगाची पूजा करतील

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Devendra Fadnavis आषाढीला फडणवीस पांडुरंगाची पूजा करतील

Devendra Fadnavis आषाढीला फडणवीस पांडुरंगाची पूजा करतील

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697