मुंबई : बाळापूरचे आमदार नितीन देशमुख रुग्णालयात दाखल शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच त्यांच्यासोबत सूरतमध्ये 35 आमदार असल्याचंही बोललं जातंय. अशातच शिंदे यांच्यासोबत असलेले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख रुग्णालयात दाखल झाले आहेत. MLA Nitin Deshmukh admitted to Gujarat hospital, wife reported missing by police
देशमुख यांना पहाटे अस्वस्थ वाटल्याने, छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी सुरतच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी पोलिसांकडे केली आहे.
मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर फोन बंद, कोणताही संपर्क नाही, सकाळपर्यंत संपर्क न झाल्याने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केलीय. एकनाथ शिंदे काही आमदारांसहित सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून दिपाली सय्यद यांनीदेखील ट्वीट केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं असून असून शिवसेनेचा वाघ झेपणार नाही अशा शब्दांत सुनावलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/565802598430807/
विधानपरिषद निवडणूकीच्या मतदानानंतर मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांचा फोन बंद लागला. तसेच सकाळपर्यंत कोणताही संपर्क न झाल्याने बेपत्ता असल्याची तक्रार प्रांजली यांनी दाखल केली आहे.
विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. सध्या नाराज एकनाथ शिंदे आमदारांच्या एका मोठ्या गटासह सुरतमध्ये आहेत. पण, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार नितीन देशमुख यांच्याबाबत एक मोठी अपडेट येत आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.
एकनाथ शिंदेसोबत सुरतमध्ये असलेल्या आमदारांच्या यादीत अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचेही नाव आहे. नव्या माहितीनुसार, नितीन देशमुख यांना पहाटे गंभीरावस्थेत सूरतमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या वॉर्डबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नितीन देशमुख यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे.
□ एकनाथ शिंदेसोबत कोणकोणते आमदार आहेत ?
२६ आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याची शक्यता आहे. तसंच अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हेदेखील त्यांच्यासोबत आहेत. ते नावे पुढीलप्रमाणे….
डॉ. तानाजी सावंत
बालाजी कल्याणकर
प्रकाश आबिटकर
अब्दुल सत्तार
संजय पांडुरंग शिरसाट
श्रीनिवास वनगा
महेश संभाजी शिंदे
संजय भास्कर रायमुलकर
विश्वनाथ भोईर
संदीपान भुमरे
शांताराम मोरे
रमेश बोरणारे
अनिल बाबर
चिमणराव पाटील
शंभूराज देसाई
सहाजी बापू पाटील
महेंद्र हरि दडवी
जयप्रदीप जैसवाल
महेंद्र सदाशिव थोरवे
किशोर पाटील
भारत गोगावले
ज्ञानराज चौगुले
बालाजी किडनीकर
सुहास कांदे
संजय गायकवाड
https://www.facebook.com/109399567404448/posts/565763555101378/