□ एकनाथांच्या तावडीतून उस्मानाबादचे आ. पाटील निसटले
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या भूकंपाचं केंद्र ठरलं गुजरातमधील सूरत. या राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात असल्याचं बोललं जात आहे. सुरतमध्ये ली मेरिडियन हॉटेलमधील सगळी व्यवस्था स्वतः पाटलांनी केली होती. सी. आर पाटील हे ‘ऑपरेशन लोटस’ची महत्वाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती समोर आली आहे. State earthquakes; The big hand of ‘this’ person, took away the phone from all the MLAs
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांकडून मोबाईल फोन काढून घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने संपर्क करु नये, यासाठी खबरदारी म्हणून त्यांचे मोबाईल फोन काढून घेतले आहेत. दरम्यान, शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आहेत. हे सर्व सध्या गुवाहाटीत दाखल झाले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
बंडखोर आमदारांचा पहिला फोटो आला समोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा पहिला फोटो आता समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांना जवळपास 33 आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांचादेखील समावेश आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या भूकंपाचं केंद्र ठरलं गुजरातमधील सूरत. या राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात असल्याचं बोललं जात आहे. सुरतमध्ये ली मेरिडियन हॉटेलमधील सगळी व्यवस्था स्वतः पाटलांनी केली होती. सी. आर पाटील हे ‘ऑपरेशन लोटस’ची महत्वाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान दिल्लीतली बैठक आटोपून शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर पवार मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईत आल्यानंतर आजच रात्री तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील आहेत. यामुळे राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राष्ट्रपती पदासाठी जी बैठक घेण्यात आली होती ती बैठक आटोपून ते तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. ते मुंबईत आल्यानंतर तिन्ही पक्षांची ते बैठक घेणार असल्याचे बोलले जात आहे. ते मुंबईत आल्यानंतर महाविकास आघाडीबाबत काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.
□ एकनाथांच्या तावडीतून उस्मानाबादचे पाटील निसटले
सोलापूर : जेवणासाठी बाहेर जाण्याची मारलेली थाप, वेगळ्याच दिशेला निघालेली गाडी, त्यातून आलेला संशय आणि काही तरी अघटित घडत असल्याची कुणकुण लागताच उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी गाडीचालकास लघुशंकेची थाप मारून गुजरात बॉर्डरवरून पलायन केले आणि थेट ‘मातोश्री’ गाठली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566273218383745/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
विधानपरिषद निवडणूक संपल्यावर एकनाथ शिंदे यांनी जेवायला बोलाविले आहे, असे सांगून आ. कैलास पाटील यांना एका खासगी गाडीतून मुंबई बाहेर नेण्यात आले. ठाण्यापासून सुमारे ४० किमी पुढे गाडी गेल्यानंतर काहीतरी गडबड आहे, कैलास पाटील यांच्या लक्षात आले. त्याच क्षणी त्यांनी तेथून निसटण्याचा निश्चय केला.
मला लघुशंकेला थांबायचं आहे असे सांगून ते गाडीतून उतरले. अंधाराचा फायदा घेऊन से तिथून पसार झाले. जीव धोक्यात घालून कैलास पाटील यांनी संबंधित सर्वानाच गुंगारा देत रात्रीच्या अंधारात गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवरून भर पावसात ४ किमी पायी आले. त्यानंतर मिळेल त्या गाडीने त्यांनी मुंबई गाठली. खुद्द आमदार कैलास पाटील यांनी हा किस्सा शिवसेना नेतृत्वाला सांगितला.
□ शिवसेनेला आणखी एक मोठा झटका; अनिल परब संकटात
शिवसेनेचे नेते अनिल परब यांची ईडीकडून तब्बल 9 तासांपासून चौकशी सुरू आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणी त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. त्यामुळे अनिल परबांवर अटकेची टांगती तलवार आहे. अशा चर्चा रंगत आहेत. तसेच एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेवर सरकार कोसळण्याचे संकट आहे. त्यामुळे शिवसेना दुहेरी संकटात सापडली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) कोणत्याही क्षणी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनिल परब यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या ९ तासांपासून अनिल परब यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे.
सध्या नाराथ एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या स्थितीत आले आहे. यात परब यांच्यावर कारवाई होऊन जर अटक झाली तर शिवसेनेला आणखीन मोठा झटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566258021718598/