मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्यामुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेतील 11 आमदारांसोबत त्यांनी सुरतच्या ल मेरेडिअन हॉटेलमध्ये तळ ठोकला असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला आहे. काही आमदारांना घेराबंदी करून गुजरातमध्ये ठेवण्यात आले आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. Contact was made with Eknath Shinde, Maharashtra will not have the same pattern as Madhya Pradesh: Sanjay Raut Politics
विधानपरिषदेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीतून खदखद बाहेर येत आहे.फडणवीसांनी पाचही जागा निवडून आणल्याने राज्यात घडामोडींना मोठा वेग आला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून मुक्काम हालवला असून त्यांनी गुजरातमध्ये आश्रय घेतला असल्याचे समोर आले आहे. ते आज पत्रकार परिषदही घेणार असल्याचं समोर आल आहे.
यातच आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. तर त्या वेळी बोलताना राऊत म्हणाले की, सेनेचा एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला आहे. मात्र शिंदे आणि सेनेमध्ये काय बोलणं झालं आहे ते अध्याप समोर आलेलं नाहीये. महाष्ट्रात मध्यप्रदेश सारखा पॅटर्न चालणार नाही असंही यावेळी राऊत म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/565755265102207/
दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत देखील आमचा संपर्क सुरु आहे. स्वत:ला किंगमेकर समजणाऱ्या सरकार आम्हाला कमजोर करू शकणार नाही. आमच्या आमदारांना गुजरामध्ये अडकवून ठेवले आहे, आमचे शिवसैनिक निष्ठावंत आहेत ते आमच्या कडे परत येतील अस राऊत पुढे म्हणाले.
आमचे शिवसैनिक आमच्याकडे परत येतील असेही राऊत म्हणाले. राज्यात कोणत्याही प्रकारचा भूकंप होणार नाही असेही राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे राऊत म्हणाले.
काही गैरसमजातून त्यांनी गुजरातला नेण्यात आलं असल्याचे राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेसुद्धा मुंबईच्या बाहेर आहेत. त्यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क झाला आहे. जे चित्र बाहेर निर्माण केलं जात आहे की भूकंप होईल किंवा अन्य काही होईल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झालं आहे, ते लवकरच दूर होईल असे राऊत म्हणाले. आता आम्ही वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात आहोत. त्यांच्यासोबत बैठक होणार असल्याचं राऊतांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत संपर्क झाल्याचेही राऊत म्हणाले. दरम्यान, भाजपचा घाव हा छातीवर नसून पाठीवर असल्याचे राऊत म्हणाले.
□ आमदार फुटतील अन भाजपचे सरकार येणार, एकनाथ शिंदेंच्या गुरूचा दावा
नाशिक – राज्यातील २२ आमदार फुटतील आणि राज्यात लवकरच भाजपाचे मंत्रिमंडळ स्थापन होईल, असा दावा जामनगर सौराष्ट्र येथील जगद्गुरू सुर्याचार्य कृष्णादेवनंद गिरीजी महाराज यांनी आज केला आहे.
आज सकाळी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे १७ आमदारांसह नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांचे गुरू असल्याचा दावा करणाऱ्या कृष्णदेवनंद यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे भाजपाचे सरकार यावे आणि सर्व आमदार सुरक्षित राहावे यासाठी श्री त्र्यंबकेश्वर येथे अभिषेक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी समर्थ रामदास स्वामी यांनी अभिषेक केला त्यानुसार आपण अभिषेक करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
□ काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश
#सुराज्यडिजिटल #Congress #orders #surajyadigital #काँग्रेस
काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी हे आदेश दिले आहेत. मुंबईत असलेल्या आमदारांना दुपारी 12 वाजेपर्यंत रिपोर्ट करण्यास सांगितलं आहे. तर मुंबईबाहेर आपापल्या मतदारसंघात पोहोचलेल्या आमदारांना दुपारी 4 वाजता दाखल होण्यास सांगितलं.
https://www.facebook.com/109399567404448/posts/565693525108381/