शिवसेनेची जन्मभूमी मुंबई तर कर्मभूमी ठाणे मानली जाते. हिंदुत्ववादी नेते म्हणून ज्यांच्याकडे सारा महाराष्ट्र पाहात होता, ते आनंद दिघे. काँग्रेस राजवटीवर व समाजात अन्याय होत असेल तर त्यावर प्रखर आंदोलन करण्याची धमक दिघेंनी दाखवली होती. कडवा हिंदुत्ववादी म्हणून त्यांची ओळख होती. भाषणही आक्रमक असायचे. शिवसेनेत असा कुणी नेता असला तर तो शिवसेनाप्रमुखांचा विश्वासू व्हायचा. दिघेंनी हाच बहुमान मिळवला होता. Is the intrusion of loyalists, the circle around Eknath Shinde consuming the shivsena or not? Politics Blog
आनंद दिघेंनी अशी फळी निर्माण केली की, त्यांच्या मुशीत घडलेला प्रत्येक कार्यकर्ता हा आक्रमकच आहे. एकनाथ शिंदे हे त्यापैकीच एक नेते. दिघे यांच्यानंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रोवून धरणाऱ्या शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेली राजकीय आघाडी रुचली नाही.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही ठाणे, कल्याण, डोंबिवली यासारख्या शहरांमधील भाजप नेते तसेच संघाशी संबंधित वर्तुळाशी शिंदे यांनी निकटचे संबंध ठेवले. मध्यंतरी सरसंघचालक मोहन भागवत ठाण्यात आले असता जाहीर कार्यक्रमात शिंदे यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कारही केला. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या वागळे इस्टेट परिसरात कोविड काळात संघाशी संबंधित कार्यकर्त्यांची एक मोठी फळी कार्यरत होती.
या मंडळींना हरतऱ्हेची मदत करण्यात शिंदे आणि त्यांचे समर्थक पुढे असायचे. राज्यातील राजकारणात शिवसेना वेगळ्या दिशेने निघाली असली तरी ठाण्यातील राजकारणाचा संघ आणि भाजपशी असलेल्या जुन्या मैत्रीचे बंध कायम ठेवायचे अशाच पध्दतीचे राजकारण शिंदे करत राहिल्याचे दिसून येते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/566969108314156/
रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्यासारख्या नेत्यांच्या माध्यमातून ठाणे, डोंबिवली पट्ट्यात नेहमीच संघ आणि भाजपचा प्रभाव दिसून आला आहे. दिघे यांनी मात्र हिंदुत्वाचे आक्रमक राजकारण करत भाजपच्या ताब्यात असलेल्या लोकसभा, विधानसभेच्या जागा शिवसेनेकडे खेचून घेतल्या आणि जिल्ह्यातील राजकारणात शिवसेना मोठा भाऊ कसा राहील याची पुरेपूर दक्षता घेतली.
दिघे यांच्यानंतर शिवसेनेची धुरा खांद्यावर घेतलेले शिंदे यांनीही पक्षाचा प्रभाव अजिबात कमी होऊ दिला नाही. मात्र संघाशी संबंधित संस्था, कार्यकर्ते यांच्याशी संबंध उत्तम कसे राहतील याचीही पुरेपूर काळजी त्यांनी घेतली. संघाच्या प्रभात बैठकांना हजेरी लावणे, ठाणे-कल्याणातील संघनिष्ठांशी संवाद साधणे, भाजपचे नेते आमदार यांच्याशी सलोख्याचे संबंध रहातील अशाच पद्धतीने शिंदे यांचे राजकारण सुरू राहिले.
शिवसेना-भाजपच्या मैत्री काळात जागा वाटप अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेचा वाटा देताना शिंदे यांनी भाजप फारसा दुखावला जाणार नाही ही देखील काळजी घेतली. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेलेले आनंद परांजपे यांच्या विरोधात कोणाला रिंगणात उतरवायचे हा प्रश्न शिवसेनेपुढे होता. त्यावेळी राजकारणाची बाराखडी देखील गावी नसलेल्या पुत्राला रिंगणात उतरविण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला.
भाजप – संघनिष्ठांची एक मोठी फळी कल्याण डोंबिवलीत प्रभावी राहिलेली आहे. हिंदुत्ववादी विचारांचा पगडाही या शहरांवर आहे. त्यामुळे ठाण्यापेक्षा कल्याण आपल्या मुलासाठी अधिक सुरक्षित राहील हे शिंदे यांनी जोखले होते. त्यानंतर झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने शिंदे आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतरही शिंदे यांनी डोंबिवलीतील संघ-भाजप दुखावला जाणार नाही याची काळजी सतत वाहिली.
नगरविकास खाते एमएमआरडीए यांच्या कारभारातील आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप यामुळे शिंदे यांची नाराजी वाढली होती. भाजपचे प्रदेश नेतेही योग्य संधीची वाट बघत होते. विधान परिषद निवडणूक ही संधी भाजप आणि भाजपचे मित्र असलेले शिंदे यांना मिळाली आणि सोमवारी याची प्रचिती अनेकांना आली इतकेच. शिंदे यांच्या भोवती असलेले वलय सेनेला खुपत होते की काय? हरत-हेच्या ठिकाणी त्यांना रोखण्याचा कट शिवसेनेत रचला गेला. आज संजय राऊत हे निष्ठेची व्याख्या सांगत आहे. जो घुसमट सहन करत राहील, तोच का निष्ठावंत. आपल्या भावना पक्षात मांडायच्या नाहीत काय? निष्ठावंतांची कदर केली नाही, ही चूक सेना नेतृत्व का मान्य करत नाही.
✍ ✍ ✍
दैनिक सुराज्य, संपादकीय लेख
https://www.facebook.com/109399567404448/posts/566712138339853/