मुंबई : शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनिल राऊत हे देखील गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने सुनिल राऊत नाराज झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आज ते थेट शिंदे गटात सहभागी होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यातून त्यांना मनातील धुसफूस दाखवून द्यायची आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. Shiv Sena split in Sanjay Raut’s house? Discussion of MLA brother Sunil Raut going to Guwahati Politics Goa
एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 50 आमदार घेऊन गेल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. दरम्यान, संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनिल राऊत शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, “माझे कुटुंब मेले तरी चालेल पण मी शिवसेनेसोबत बेईमानी करणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना आमचा श्वास आहे. बोलणारे बोलू देत, जास्तीत जास्त काय होईल सत्ता, खासदारकी जाईल पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शिवसेनेसोबत आहोत असे संजय राऊत म्हणाले आहेत,” अशी स्पष्टोक्ती संजय राऊतांनी केली.
सुनिल राऊत हे सध्या कांजूरमार्ग येथे सभा घेत असल्याचा खुलासा त्यांनी केला. दरम्यान, 2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुनिल राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. पण, आता स्वतः संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या चर्चा स्वतः सुनिल राऊत यांनी फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, माध्यमांनी चुकून गुवाहटी सांगितला असेल, मी खरंतर निसर्गप्रेमी, त्यामुळे गोव्याला जाणार होतो. तिकडे जावून त्यांची तोंड बघण्यापेक्षा मी गोव्याला जाईल. बाकीच्या बातम्या केवळ जाणून-बुजून पसरवल्या जात आहेत. लोकांना आणि तिकडे असलेल्या आमदारांना कन्फ्युज करत आहेत, की संजय राऊत यांचा भाऊही गुवाहटीला जात आहे. सुनील राऊत हा बाळासाहेबांचा सैनिक आहे. आम्हाला कापलं तरी शिवसेना आणि बाळासाहेब असतील. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आणि शिवसेना राहणार आहोत.
□ शिवसेनेच्या दोन गटातील लढाई आता सुप्रीम कोर्टात, दोन याचिका दाखल
मुंबई : शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. एकनाथ शिंदे गटाने 2 वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी दिलेल्या आपात्रतेच्या नोटीसीविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच, उद्धव ठाकरे गटाने अजय चौधरी यांची गटनेते पदी केलेली नियुक्ती अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा पुढील अंक आता अपेक्षनुसार कोर्टात रंगणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. या नोटिशी विरोधात एकनाथ शिंदे आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
□ देशातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय
देशात झालेल्या लोकसभेच्या व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर व आझमगड हे 2 लोकसभा मतदारसंघ भाजपने जिंकले आहेत. सपाचा बालेकिल्ला असलेल्या आझमगडमधून भाजपच्या दिनेश लाल यादव निरहुआ यांनी अखिलेश यादव यांचे भाऊ धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला आहे. तसेच, त्रिपुरामध्ये भाजपने 4 पैकी 3 जागा जिंकल्या आहेत आणि काँग्रेसने 1 जागा जिंकली आहे.