मुंबई : शिवसेनेच्या शिंदे समर्थक 39 आमदारांना वेगळा गट स्थापन करतांना अडचणी आल्या आणि विलीनीकरणाची गरज पडली तर मनसे हा पर्याय ठरु शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, सर्वप्रथम ‘शिवसेना- बाळासाहेब ठाकरे’ या गटाची स्थापन करण्याचा प्रयत्न राहील. याबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास मनसे पर्याय ठरणार आहे. मात्र, ही गरज पडणार नसल्याचे शिंदे समर्थक आमदारांचे म्हणणे आहे. If the time comes to merge, MNS is also an option Technical difficulty politics
शिंदे गट हा मनसेत सामील होणार आहे कारण मनसे हीसुद्धा शिवसेनेतून बाहेर पडून स्थापन झाली आहे अशा चर्चा सध्या माध्यमांत पसरू लागल्या आहेत पण यासंदर्भात शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“आम्हाला कोणत्याच गटात सामील होण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही शिवसेनेचा भाग आहोत. आमचा हा मूळ शिवसेनेचाच गट आहे पण जे उरलेले १४ आमदार आहेत त्यांनी कोणत्या गटात जायचं ते ठरवावं. आम्हाला कोणत्याच पक्षात जायची गरज नाही आमचा मूळ पक्ष हा शिवसेनाच आहे. उरलेल्या १४ लोकांनीही आमच्याच गटात यावं, कारण आम्ही सगळे शिवसेनेला मानतो, ते आमच्याकडे आले तर त्यांना नक्कीच फायदा होईल.” असं ते म्हणाले.
शिवसेनेतून बंड करून पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांवर अपात्रतेच्या कारवाई होण्याची टांगती तलवार आहे. यापासून वाचण्यासाठी शिंदे गटाला इतर पक्षात विलीन व्हावे लागणार आहे. यात आधी भाजप आणि प्रहार या दोन पक्षांचा पर्याय त्यांच्या समोर होता. आता त्यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचा पर्याय देखील असल्याचं सांगितलं जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/569333194744414/
शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलिनीकरण करावे लागणार आहे. नाहीतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते असं शिवसेनेच्या वकिलांनी सांगितलं आहे. पक्षांतरबंदी कारवाईपासून वाचवायचं असेल तर एकूण संख्याबळापैकी दोन तृतीयांश संख्या गटाला आवश्यक असते पण तो गट एखाद्या पक्षात विलिनीकरण करावा लागतो नाहीतर बहुमत असतानाही कारवाईला सामोरे जावं लागणार आहे असं शिवसेनेचे वकील म्हणाले होते.
माहितीनुसार, शिंदे गटाकडून पर्यायांची चाचपणी सुरू आहे. जर शिंदे गट विलीन करण्याची वेळ आल्यास मनसेमध्येही हा गट सामील होऊ शकतो. विलीनीकरणासाठी शिंदे गट मनसेकडे प्रमुख पर्याय म्हणून बघत असल्याचं सांगण्यात येत आहेत. यामागचं कारण सांगितलं जात आहे की, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी वारंवार सागितलं आहे की, ते हिंदुत्वासाठी वेगळे होते आहेत. त्यांचं हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे. यातच अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली आहे, ती बाळासाहेब ठाकरेंच्या पद्धतीची आहे. यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबत मनसेमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेकडे असा कोणताही पर्याय आल्यास, मनसे ही ऑफर स्वीकारेल. तसेच शिंदे गटाचे मनसेत विलानीकरण होऊ शकतं. याआधी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या एकमेव आमदाराचे मत भाजपकडे गेले होते. याचे कारण म्हणजे हे दोन्ही पक्ष समविचारी आहेत.
त्यामुळे मनसे आमदाराने भाजप उमेदवारांना आपलं मत दिलं. अशातच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो, अशी चर्चा आहे. तसेच मनसेचे काही नेते आणि शिंदे गटातील काही प्रमुख आमदारांची याविषयी चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या हालचालींना वेग येईल, असंही सांगण्यात येत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/569231604754573/