मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दोनदा दूरध्वनीवरून चर्चा केली. शिंदे यांनी ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय परिस्थितीबद्दल बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, अशी पुष्टी मनसेच्या एका नेत्याने केली. Eknath Shinde’s phone call to Raj Thackeray, government’s support, Sanjay Raut’s reaction
शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. महाविकास आघाडीचा 38 आमदारांनी पाठिंबा काढल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. पाठिंबा काढल्याने ठाकरे सरकारने बहुमत गमावले आहे. पण तरी देखील विधानसभा उपाध्यक्ष कार्यालयाचा दुरुपयोग सुरु आहे, राज्य सरकार यात हस्तक्षेप करत आहे, असा दावा या याचिकेत केल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा केली आणि त्यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. मनसेच्या एका नेत्यानेही याला दुजोरा दिला आहे. अशा परिस्थितीत हे दोघे एकत्र आल्यास उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसू शकतो. एकेकाळी शिवसेनेने मनसेचे 7 आमदार फोडले होते.
आता शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गट राजकारणासाठी नवे पर्याय शोधत असल्याचे वृत्त आहे. शिवसेनेच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिंदे गटाला ठाकरे नाव आणि हिंदुत्व दोन्ही सोडायचे नाही. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे गटातील ३८ आमदार राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश करू शकतात अशी चर्चा सुरु आहे.
कारण एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माध्यमांशी बोलातना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशीही या मुद्द्यावर फोनवर चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केल्याचे बोलले जात असले तरी, यामागचे खरे कारण शिंदे गटाला मनसेत प्रवेश करून राज्यातील राजकारणाची नवी समीकरणे निर्माण करायची असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
“बंडखोर आमदार एमआयएम, समाजवादी पक्षातही जाऊ शकतात. आमदारकी वाचवायची असेल तर ते अशा पक्षात जाऊ शकतात. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला त्याचा द्वेष करत असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही. बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणर असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना रविवारी फोन केला.
काल रविवारी सायंकाळी एकनाथ शिंदेंनी राज यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिंदे आणि राज यांच्यामध्ये काही मिनिटं प्रकृतीसंदर्भातील चर्चा झाली. राज यांना शनिवारी रुग्णालयामध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. शस्त्रक्रियेनंतर राज शनिवारी घरी परतल्याचं त्यांनीच ट्विटरवरुन जाहीर केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी थेट राज यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन प्रकृतीसंदर्भातील माहिती घेतली. तसेच राज यांची या दुखण्यापासून लवकर सुटका व्हावी अशा शुभेच्छाही शिंदेंनी दिल्याचे वृत्त आहे.
शिवसेनेपासून वेगळे होण्यापूर्वी राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी मानले जात होते. त्यांची वृत्तीही बाळासाहेबांसारखीच राहिली आहे. त्यांचे राजकारणही कमी-अधिक प्रमाणात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखेच आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण गट राज ठाकरेंच्या मनसेमध्ये विलीन झाला तर केवळ आमदारांचे सदस्यत्वच वाचणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना देखील लगेच भावी नेता म्हणून पुढे आणण्याचे काम सुरू केले. त्यामुळे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना आपल्या भवितव्याचे काय? असा प्रश्न पडला. राज ठाकरे यांच्याबाबतीत असे नाही. त्यांनी कधीही स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे सांगितलेले नाही. माझ्या पक्षाच्या हातात सत्ता द्या. मी बदल करून दाखवतो, असे ते कायम म्हणत आले आहेत. शिवाय त्यांचा मुलगाही अजून नव्याने राजकारणात उभा राहू पाहत आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच मनसेसोबत जाण्याला शिवसेनेतील बंडखोर गटानेही मान्यता दिल्याचे समजते.
उद्धव ठाकरे गेले तरी राज ठाकरे सोबत राहतील. एक ठाकरे आपल्यासोबत आहेत, शिवाय हिंदुत्वही आहे. यासारखी चांगली परिस्थिती दुसरी असू शकणार नाही. आपण भाजपमध्ये प्रवेश करत नाही, मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंसोबत गेलो असे म्हणायला बंडखोरांचा गट मोकळा होईल. राज ठाकरे यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात स्वतःची स्पेस तयार करायची आहे. बंडखोरांचे मुख्य शत्रू देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आहेत. त्यामुळे ‘दुश्मन का दुश्मन, अपना दोस्त’ अशी नीती असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/569622504715483/
● तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास मनसे पर्याय ठरणार
शिवसेनेच्या शिंदे समर्थक 39 आमदारांना वेगळा गट स्थापन करतांना अडचणी आल्या आणि विलीनीकरणाची गरज पडली तर मनसे हा पर्याय ठरु शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, सर्वप्रथम ‘शिवसेना- बाळासाहेब ठाकरे’ या गटाची स्थापन करण्याचा प्रयत्न राहील. याबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास मनसे पर्याय ठरणार आहे. मात्र, ही गरज पडणार नसल्याचे शिंदे समर्थक आमदारांचे म्हणणे आहे.
शिंदे गट हा मनसेत सामील होणार आहे कारण मनसे हीसुद्धा शिवसेनेतून बाहेर पडून स्थापन झाली आहे अशा चर्चा सध्या माध्यमांत पसरू लागल्या आहेत पण यासंदर्भात शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“आम्हाला कोणत्याच गटात सामील होण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही शिवसेनेचा भाग आहोत. आमचा हा मूळ शिवसेनेचाच गट आहे पण जे उरलेले १४ आमदार आहेत त्यांनी कोणत्या गटात जायचं ते ठरवावं. आम्हाला कोणत्याच पक्षात जायची गरज नाही आमचा मूळ पक्ष हा शिवसेनाच आहे. उरलेल्या १४ लोकांनीही आमच्याच गटात यावं, कारण आम्ही सगळे शिवसेनेला मानतो, ते आमच्याकडे आले तर त्यांना नक्कीच फायदा होईल.” असं ते म्हणाले.
शिवसेनेतून बंड करून पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांवर अपात्रतेच्या कारवाई होण्याची टांगती तलवार आहे. यापासून वाचण्यासाठी शिंदे गटाला इतर पक्षात विलीन व्हावे लागणार आहे. यात आधी भाजप आणि प्रहार या दोन पक्षांचा पर्याय त्यांच्या समोर होता. आता त्यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचा पर्याय देखील असल्याचं सांगितलं जात आहे.
शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलिनीकरण करावे लागणार आहे. नाहीतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते असं शिवसेनेच्या वकिलांनी सांगितलं आहे. पक्षांतरबंदी कारवाईपासून वाचवायचं असेल तर एकूण संख्याबळापैकी दोन तृतीयांश संख्या गटाला आवश्यक असते पण तो गट एखाद्या पक्षात विलिनीकरण करावा लागतो नाहीतर बहुमत असतानाही कारवाईला सामोरे जावं लागणार आहे असं शिवसेनेचे वकील म्हणाले होते.
माहितीनुसार, शिंदे गटाकडून पर्यायांची चाचपणी सुरू आहे. जर शिंदे गट विलीन करण्याची वेळ आल्यास मनसेमध्येही हा गट सामील होऊ शकतो. विलीनीकरणासाठी शिंदे गट मनसेकडे प्रमुख पर्याय म्हणून बघत असल्याचं सांगण्यात येत आहेत. यामागचं कारण सांगितलं जात आहे की, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी वारंवार सागितलं आहे की, ते हिंदुत्वासाठी वेगळे होते आहेत. त्यांचं हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे. यातच अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली आहे, ती बाळासाहेब ठाकरेंच्या पद्धतीची आहे. यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबत मनसेमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेकडे असा कोणताही पर्याय आल्यास, मनसे ही ऑफर स्वीकारेल. तसेच शिंदे गटाचे मनसेत विलानीकरण होऊ शकतं. याआधी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या एकमेव आमदाराचे मत भाजपकडे गेले होते. याचे कारण म्हणजे हे दोन्ही पक्ष समविचारी आहेत.
त्यामुळे मनसे आमदाराने भाजप उमेदवारांना आपलं मत दिलं. अशातच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो, अशी चर्चा आहे. तसेच मनसेचे काही नेते आणि शिंदे गटातील काही प्रमुख आमदारांची याविषयी चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या हालचालींना वेग येईल, असंही सांगण्यात येत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/569567384720995/