अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर – तोळणूर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. कर्नाटक राज्यातील कर्नाटक एसटी आणि नवीन इर्टींगा समोरासमोर धडक झाल्याने 1 जण जागीच मृत्यू 3 जण जखमी कारमधील प्रवासी नाशिकचे रहिवासी असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. ST car accident on Akkalkot road; One killed, three injured
अक्कलकोट तोळणूर रस्त्यावर नागणसूर गावाजवळ कर्नाटक विभागाची बस व कारच्या भीषण अपघातामध्ये कारमधील एकजण मयत तर इतर सहाजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी ( २६ जून) रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला.
विनायक घोरसे (वय ४०) असे मयताचे नांव आहे. कर्नाटक बस (क्रमांक के.ए.२८ एफ २२९७ ) ही विजापूर आगाराची बस सोलापूरहून तोळणूरमार्गे विजापूरकडे जात होती. तेव्हा तोळणूरवरून अक्कलकोट कडे येणाऱ्या कार (क्रमांक एम.एच.१४ के बी ५८७७) ही समोरून येणाऱ्या कर्नाटक बसवर आदळून अपघात झाला.
यात कारचा चक्काचूर झाला. कारमधील विनायक घोरसे (वय ४०) हा जागेवर मयत झाला तर इतर दीपक क्षिरसागर वय अंदाजे ५४, राघव निकम वय ५१, रमेश कोडतरकर वय ५८, रघुनाथ कोटोळे वय ५४ , सचीन भ्रम्हणकर वय ४० व कन्हैय्यालाल सोनवणे वय ५४ (सर्व रा.नाशिक) गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या सर्वांना खासगी रूग्णवाहिकेतून सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कारमधील सर्वच गंभीर जखमी झाल्याने रात्री उशिरापर्यंत दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कर्नाटक बस चालक आमसिद्ध सोमलिंग सावकार (वय ४२) हा बस चालवत होता. कारमधील सर्वजण अक्कलकोट येथील नातेवाईकांचे देवकार्य असल्याने नाशिकहुन आले होते. देवकार्य उरकून अक्कलकोटकडे येत असताना हा अपघात झाला. अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन जखमींना रूग्णालयात पाठविले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/569701838040883/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ शॉर्टसर्किटमुळे ऑटोमोबाइल दुकानाला आग
सोलापूर : सांगोला तालुक्यातील श्रीराम ऑटोमोबाईल या मोटरसायकलच्या साहित्याच्या दुकानाला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सांगोला तालुक्यातील मोटरसायकलचे साहित्य मिळण्याचे एकमेव होलसेल दुकान म्हणूनच श्रीराम ऑटोमोबाइल हे दुकान आहे. या श्रीराम ऑटोमोबाइल दुकानाला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता प्राथमिक अंदाज आहे.
या शॉर्टसर्किटमुळे दोन मजली असलेले स्पेअर पार्टचे साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. श्रीराम ऑटोमोबाइल या दुकानाचे मालक नामदेव आदलिंगे असुन, या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
□ मोदी परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – मोदी परिसरातील जगजीवनराम वस्ती येथे राहणाऱ्या सिद्धार्थ देविदास सोनवणे (वय २५) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
काल शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास त्याने घरातील छताच्या लाकडी वाशाला साडीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला. या घटनेची नोंद सदरबझार पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही.
https://www.facebook.com/109399567404448/posts/569622504715483/