□ उळे येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले स्वागत
सोलापूर : ‘गण गण गणात बोते’ आणि विठुनामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज शनिवारी (दि.2 जुलै) सायंकाळी उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. Gajanan Maharaj palanquin arrives in Solapur district, palanquin tomorrow at Prabhakar Maharaj temple and Monday at Upalap Mangal office
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखी व वारकऱ्यांचे भक्तिभावात स्वागत केले. यावेळी प्रांत अधिकारी हेमंत निकम, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, उळे गावचे सरपंच अप्पा धनके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, मंडळ अधिकारी चंद्रकांत हेडगिरे, सुखदेव पाटील, जगदीश धनुरे यांच्यासह वारकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखीचा आजचा मुक्काम उळे येथे असून उद्या सकाळी पालखी सोलापूर शहरात प्रवेश करणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/573422994335434/
□ संत गजानन महाराज पालखी आज प्रभाकर महाराज मंदिरात
आषाढी एकादशीनिमित्त शेगाव होऊन पंढरपूरला निघालेली शेगाव संस्थानची श्री संत गजानन महाराजांची पालखी आज (रविवारी) सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात येणार आहे, अशी माहिती श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख यांनी दिली.
श्री संत गजानन महाराज पालखी सोलापूरात आल्यानंतर सकाळी ११ वाजता प्रभाकर महाराज मंदिरात येईल. या ठिकाणी श्री सद्गुरू प्रभाकर महाराज व श्री संत शेगाव गजानन महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा होईल. श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरातर्फे पालखीचे पूजन होणार आहे. श्री संत गजानन महाराजांचा आवडता पदार्थ असलेल्या पिठलं भाकरीचा नैवेद्य यावेळी दाखवला जाईल. यानंतर आरती होऊन भाविकांना दर्शन व महाप्रसाद मिळणार आहे. सोलापूरकरांनी यावेळी उपस्थित रहावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभाकर महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख यांनी केले आहे.
□ सोमवारी गजानन महाराज पालखीचे उपलप मंगल कार्यालयात होणार दर्शन
पंढरपूरला आषाढी वारीसाठी निघालेली शेगाव येथील श्री गजानन महाराजांची पालखी सोमवार दि. 4 जुलै रोजी सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात येणार आहे, अशी माहिती उपलप मंगल कार्यालयाचे मालक ऋतुराज उपलप यांनी दिली.
कोरोनामुळे दोन वर्षाच्या काळानंतर श्री गजानन महाराजांची पालखी सोलापुरात येत आहे. सोमवार दि. 4 जुलै रोजी सकाळी 10 वाजता श्री गजानन महाराजांची पालखी उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी येईल. प्रथेप्रमाणे पालखीचे स्वागत करण्यात येईल. दिवसभर पालखीच्या दर्शनाची व्यवस्था असणार आहे. पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांची उपलप परिवाराकडून जेवणाची आणि मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून शिरा देण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे श्री गजानन महाराज पालखी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ऋतुराज उपलप यांनी केले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/573419837669083/