मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदासाठी आज निवड झाली. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. परंतु यामध्ये शिवसेनेने जारी केलेला व्हीपचे 39 बंडखोर आमदारांनी पालन केले नाही. त्यामुळे शिवसेनेने त्या आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांना पाठवले आहे. MLAs blow the whip; Letter of Shiv Sena and Shinde group to the Assembly Speaker
राज्यपालांच्या आदेशानुसार आज रविवारी (३ जुलै) विधानसभेचे विशेष अधिवेशन झाले. शिवसेनेने व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली.
तर, शिंदे गटाकड़ूनही 16 आमदारांनी व्हीप मोडला असल्याची तक्रार दिली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी अखेर आज रविवारी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले. याबद्दल शिवसेनेने तातडीने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार दाखल केली. शिवसेनेची तक्रार सभागृहाच्या पटलावर घेतली आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली, पण विधानसभेच्या नियमानुसार पक्षाने जो व्हीप बजावला होता, त्याच्या विरोधात जाऊन 39 आमदारांनी मतदान केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/574176307593436/
शिवसेनेमधील उर्वरित 16 आमदार कोणाचा व्हीप मान्य करणार? याकडे लक्ष होते. विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कामकाजाला सुरुवात होताच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे शिवसेना पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी बंडखोर 39 आमदारांनी पक्षादेश झुगारल्याचे पत्र दिलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी हे पत्र रेकॉर्डवर आणण्याची सूचना केली.
आम्ही सर्व आमदारांच्या नावानिशी तक्रार अध्यक्षांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्ही आधीच 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यावर आता सुनावणी होणार आहे, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली. या 39 आमदारांनी व्हीप मोडून मतदान केले आहे. त्यामुळे आमचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला आहे.
तांत्रिक दृष्ट्या जे योग्य आहे, त्यानुसार कारवाई केली पाहिजे, असे सुनील प्रभू म्हणाले. दुसरीकडे, एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. आमचा खरा गट असून, आम्ही बजावलेल्या व्हीपच्या विरोधात जाऊन शिवसेनेतील 16 आमदारांनी पक्षाविरोधात मतदान केले आहे, अशी तक्रार शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून भरत गोगावले यांनी दिली आहे.
दरम्यान, आमदार अपात्रतेच्या कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयमध्ये प्रकरण प्रलंबित आहे. 11 जुलैला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/574061317604935/