Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात ‘हरी नामा’च्या गजरात आगमन

Mauli's palanquin arrives in Solapur district on the eve of 'Hari Nama' Malshiras Natepute

Surajya Digital by Surajya Digital
July 4, 2022
in Uncategorized
0
माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात ‘हरी नामा’च्या गजरात आगमन
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले पालखीचे स्वागत

पंढरपूर – पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ ‘श्री’ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हरी नामाच्या गजरात आज सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथील धर्मपुरी बंगला येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले. Mauli’s palanquin arrives in Solapur district on the eve of ‘Hari Nama’ Malshiras Natepute

 

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास माजी आमदार रामहरी रूपनवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, तहसिलदार जगदिश निंबाळकर, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, सरपंच अमोल पाटील आदी उपस्थित होते. तत्पूर्वी , माऊलीच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

 

माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी 11.30.च्या सुमारास धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी , सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे , अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.

चला पंढरीसी जाऊं। रखमुमादेविवरा पाहू॥

डोळे निवतील कान। मना तेथे समाधान ॥

संतां महंता होतील भेटी। आनंदे नाचो वाळवंटी॥

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

या संत तुकाराम महाराज अंभगाने हरिनामाच्या गजरात पालखीचा जिल्हाप्रवेश झाला. पालखी अगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने कला पथकाव्दारे आरोग्य विषयक विविध योजनांची वारक-यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. वारीमधील महिला वारकऱ्यांसाठी माफक दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावे म्हणून वेंडर मशीन विसावा ठिकाणी बसविली आहे, त्याप्रमाणेच आरोग्य विभागाने वारी मध्ये प्रथमच स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे.

 

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी ‌शंभरकर यांच्या हस्ते आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे तसेच बाळासाहेब चोपदार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आषाढी यात्रा २०२२ या सोलापूर जिल्हा माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व मान्यवर अधिकाऱ्यांनी टाळ हाती धरुन हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर विसाव्या पर्यंत पायी चालले. कांरुडे येथे विसावा घेऊन माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे रवाना झाली.

 

पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणीस्वच्छ पिण्याचे, आरोग्य सुविधा, स्वच्छता,सुरक्षा तसेच विद्युत पुरवठा आदी आवश्यक सुविधा जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

 

□  पालखी सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ

पालखी सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ होत असताना रिमझिम पावसात सुरुवात झाली माऊली पालखी सोहळा विठू नामाच्या गजरात रिमझिम पावसात भिजत पालखी सोहळ्याचे नातेपुते नगरीत स्वागत होताच नातेपुते नगरपंचायतच्या वतीने नगराध्यक्ष उत्कर्षा राणी पलंगे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख सार्वजनिक बांधकाम सभापती अतुल पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता सभापती स्वाती बावकर महिला व बालकल्याण सभापती संगीता काळे तसेच नातेपुते नगरपंचायत चे सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

सोहळ्यातील वारकरी मंडळींना सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी प्राथमिक उपचार करण्यासाठी आरोग्य कर्मचारी तसेच आरोग्य दुत यांच्या नेमणूका केल्या होत्या अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाण्याचे टँकर, स्वच्छालयासाठी मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून दिले होते. ग्रामस्थांच्या वतीने अनेक ठिकाणी दिंडीतील वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

 

□ पालखी सोहळ्यात अशी यंत्रणा

४० अधिकारी ,१०५७ पोलीस कर्मचारी यांची पालखी सोहळ्यात बंदोबस्त करणार आहेत यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक १, उपविभागीय अधिकारी ४, पोलीस निरीक्षक ११, पुरुष सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस सब इन्स्पेक्टर २८, सहाय्यक अमलदार, अमलदार पोलीस निरीक्षक पोलीस सब इन्स्पेक्टर ६ ,पुरुष पोलीस अंमलदार ३५०, महिला पोलीस ९०, वाहतूक पोलीस ४८, व्हिडिओग्राफर ७, गामा कमांडो १६२ ,होमगार्ड ४००, एस. आर. पी. २ प्लाटून, बॉम्बशोधक पथक २ अशी यंत्रणा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात लावण्यात आलीय.

सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त लावण्यात आले आहे. दंगा करणाऱ्या व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निरीक्षण करण्यासाठी स्वयंसेवक व पोलीस यांचे पथक नेमण्यात आले आहे.

》 मनोज सोलवणकर ( सहाय्यक पोलीस निरीक्षक, नातेपुते पोलीस ठाणे )

 

Tags: #Mauli #palanquin #arrives #Solapur #district #HariNama #Malshiras #Natepute#माऊली #पालखी #आषाढीवारी #सोलापूर #जिल्हा #हरीनाम #गजरात #आगमन #वेळापूर
Previous Post

विश्वासदर्शक ठरावावेळी सोलापूरचे दोन आमदार परदेश दौ-यावर, काँग्रेसचे दहा आमदार गैरहजर

Next Post

वारकरी वेशभूषेत कलेक्टर, सिईओ अन् एसपी…!, हरीत वारीमुळे वारकरी व विश्वस्त सुखावले…!

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
वारकरी वेशभूषेत कलेक्टर, सिईओ अन् एसपी…!, हरीत वारीमुळे वारकरी व विश्वस्त सुखावले…!

वारकरी वेशभूषेत कलेक्टर, सिईओ अन् एसपी…!, हरीत वारीमुळे वारकरी व विश्वस्त सुखावले…!

वार्ता संग्रह

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697