सोलापूर – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात हरीत वारी चा शुभारंभ जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, सिईओ दिलीप स्वामी व पालखी सोहळ्याचे प्रमुख विकास ढगे – पाटील यांचे हस्ते करणेत आला. Collector, CEO and SP in Warkari costume! Warakari and trustees are happy because of Harit Wari…!
पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर वारकरी यांच्या वेषात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सिईओ दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी वारकरी वेशभूषेत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. डोक्यावर पांढरा शुभ्र फेटा.., गळ्यात उपरणे… पांढरा शर्ट व पायजमा घालून…. सर्वसामान्य वारक-याप्रमाणे त्यांनी आदराने वारकरी बांधवांचे स्वागत केले.
या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिंमत जाधव, माजी आमदार रामहरी रूपवनर, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, उप जिल्हाधिकारी सचिन ढोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, माळशिरसचे तहसीलदार जगदिश निंबाळकर, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सरपंच अमोल पाटील आदी उपस्थित होते.
□ सातारा प्रशासनाने दिला भावुक निरोप …!
सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी जड अंतःकरणाने माऊलींच्या पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याचे हद्दीत चालत येऊन सहभागी झाले. सोलापूर जिल्ह्यात पालखीचे आगमन झाले नंतर पालखी सोहळ्यातील विश्वस्त व वारकरी, सोलापूर जिल्हा प्रशासनाची अधिकारी यांचे समवेत हरीत वारीतील वृक्षारोपन मोहिमेत सहभागी झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ हरीत वारीमुळे वारकरी व विश्वस्त सुखावले…!
पालखी सोहळा जिथे जाईल तिथे सोहळा प्रमुख व वारकरी यांचे हस्ते वृक्षारोपन सुरू आहे. कारूंडे बंगला परिसरांत आज पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांचे हस्ते वृक्षारोपन करणेत आले. प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी विविध उपक्रमाची माहिती दिली.
□ उमेद कर्मचारी यांनी दिली सॅनिटरी नॅपकिन ची सेवा..!
पालखी सोहळ्यातील महिलांसाठी खास हिरकणी कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, सिईओ दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचे हस्ते सॅनिटरी नॅपकिन च्या मशीन चे लोकार्पण करण्यात आले. महिला वारकरी यांनी नॅपकिन चा डेमो देणेत आला. हिरकणी कक्षात अनेक महिला बालकांना घेऊन बसले होते. माऊलींचे दर्शनासाठी परिसरातून आलेल्या महिला भगिनी देखील बाळाला घेऊन हिरकणी कक्षात बसले होत्या.
□ स्वच्छता दिंडीतील कलाकारांनी दिले स्वच्छतेचे धडे..!
पालखी सोहळ्यात चित्ररथा द्वारे कलाकारांनी वारकरी बांधवांना स्वच्छतेचे धडे दिले. पालखी सोहळ्यात उभारलेले शौचालयाचा वापर करा..! प्लास्टीक इतरत्र टाकू नका. प्लास्टीक संकलन केंद्रात कचरा टाका. उघड्यावर शौचविधीस जाऊ नका. वृक्षारेपन मोहिमेत सहभागी व्हा असे विविध कलाप्रकारा मध्ये वारकरी यांचे मनोरंजन करत त्यांनी स्वच्छतेचा व पर्यावरणाचा संदेश दिला.
□ सिईओं स्वामी यांनी गळ्यात टाळ घालून गायले भजन ..!
जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी. वारकरी वेषात सर्व व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर गळ्यात टाळं घालून दिंडीत सहभागी झाले. हरिनामात तल्लीन होत. पायी वारी करत वारकरी समवेत चालले. सोबत अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी पायी वारी केली. सिईओ दिलीप स्वामी यांनी हरिनामाचा गजर करीत भजन गायले.
□ स्वच्छतादूतांचे सिईओ यांनी केले कौतुक
पालखी सोहळ्यात प्रत्येक गावातील युवक टी शर्ट घालून स्वच्छतादूत म्हणून काम करीत आहेत. वारकरी यां ना शौचालयाची माहिती देणे, परिसर स्वच्छता, प्लास्टीक संकलन, हरित वारी साठी वृक्षारोपन आजी कामे करीत आहेत.
□ आरोग्यदूत सेवेची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी ..!
जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर व सिईओ दिलीप स्वामी यांनी आरोग्यदूत उपक्रमांचा शुभारंभ केला. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शितल जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. रामचंद्र मोहिते यांनी सेवेची माहिती दिली. भाविक रूग्णांना जागेवर उपचार देणेची सोय मोबाईल आरोग्य दूत यांनी केली आहे.