मुंबई : शिंदे सरकारला 40 शिवसेना आमदारांनी समर्थन दिले. मात्र विश्वासदर्शक ठरावावेळी ज्या आमदारांनी विरोधात मतदान केले आणि शिंदे सरकारचा व्हिप नाकारला, अशा 14 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवण्यात आली आहे. आमदारांचे पद रद्द करण्याची शिफारस करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे. मात्र बाळासाहेबांवरील प्रेमामुळे यातून आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी वाचणार आहे. Aditya Thackeray’s legislature will be read, but Aditya said BJP should be careful about disqualification notice
पक्षादेश डावलून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या १४ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे.
त्या याचिकांची तपासणी करून संबंधितांना नोटीस बजावण्याबाबत अध्यक्ष निर्णय घेणार आहेत.
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी पदावर निवड झाल्यानंतर शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची, तर मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यासाठी ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा पक्षादेश (व्हिप) भरत गोगावले यांनी काढला होता. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उरलेल्या १६ पैकी आणखी एक आमदार संतोष बांगर हे रविवारी रात्री शिंदेगटात दाखल झाले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासह १५ आमदारच उरले होते. विश्वासदर्शक ठरावावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव, सुनील प्रभू, अजय चौधरी, राजन साळवी, वैभव नाईक आदी १५ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मतदान केले.
विधिमंडळातील कामकाज आटोपल्यानंतर शिंदेगटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश झुगारून शिंदेसरकारच्या विरोधात मतदान केल्याबद्दल आदित्य ठाकरे वगळता सर्व १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका दाखल केली आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असल्याने त्यांच्याविरोधात याचिका केली नसल्याचे भरत गोगावले यांनी माध्यमांना सांगितले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य होती. कायद्याला अनुसरून नव्हती. आमच्या व्हीपचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात याचिका दाखल करू. ज्यांनी कोणी व्हीपचे उल्लंघन केले, त्यांच्यावर कारवाई तर करणारच, असा इशारा शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलाय.
जे आमदार सोडून गेले आहेत त्यांना शिवसेना संपवायची आहे. पण शिवसेना कधीही संपली नाही आणि संपणार नाही. निवडणुकीला आम्ही तयार आहोत. दुप्पट ताकदीने शिवसेना पुढे येईल आणि भगवा फडकवेल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी बोलावून विचारले होते की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? त्याचा मी साक्षीदार आहे. शिंदे यांच्या भूमिकेवरून हे सिद्ध होते की ते आधीच फितूर झाले होते. जन्मपक्षात जर ते असे करू शकतात, तर कर्मपक्षातही करणार. त्यामुळे जिकडे ते गेले आहेत, त्यांनीही सावध राहावे, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/575472284130505/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ खळबळ – मृत्यू झालेल्या दोन शिवसैनिकांची पदाधिकारी म्हणून निवड
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने नवी कार्यकारिणी बनवली आहे. मात्र यात दोन मृत्यू झालेल्या शिवसैनिकांची नियुक्ती पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून विरोधकांकडून टीका होत आहे. मीरा भायंदर परिसरातील ही कार्यकारिणी आहे. उपविभाग प्रमुख म्हणून नेमलेले प्रकाश मोरे आणि भास्कर रोडे यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. मीरा भाईंदर शिवसेनेची जम्बो कार्यकारणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी काही महिन्यांपूर्वी कार्यकारणी बरखास्त करायला लावली होती. तर नव्या जम्बो कार्यकारिणीत असलेल्या दोन पदाधिकाऱ्यांचे पूर्वीच निधन झाले असताना त्यांची नावे यादीत आल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे.
आमदार सरनाईक हे संपर्कप्रमुख असताना शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या शिफारसी प्रमाणे होत होती. काही महिन्यांपूर्वी भाईंदर पश्चिम शाखेत सेनेच्या महिला व पुरुष पदाधिकाऱ्यात राडा झाल्या नंतर संपूर्ण शहराची शिवसेना कार्यकारिणी बरखास्त केली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडात आमदार सरनाईक देखील सहभागी झाले. त्यामुळे शहरातील बहुसंख्य नगरसेवक व माजी सेना पदाधिकारी, शिवसैनिक मात्र ठाकरे यांच्या सोबत आहेत, असे तर सध्या चित्र आहे. मातोश्रीवर स्वतः उद्धव ठाकरे यांनी सेना नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने ठाकरें सोबत असल्याचे चित्र आहे. त्यातूनच शिवसेनेची सोमवारी (ता. 4) प्रसिद्ध झालेली जम्बो कार्यकारणी चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान आजच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या यादीतील दोन पदाधिकाऱ्यांचे पूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या विषयावरून विरोधकांकडून टीका होत आहे. प्रभाग १० मधील पदाधिकाऱ्यांच्या यादीत उपविभाग प्रमुख म्हणून नेमलेले प्रकाश मोरे यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर प्रभाग ३ मध्ये उपविभाग प्रमुख नेमलेले भास्कर रोडे यांचे गेल्या वर्षी कोरोना काळात निधन झाले आहे.
● अशी केली सारवासारव
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या पूर्वीच्या याद्या आणि नव्याने तयार केलेली यादी एकत्र पाठवण्यात आली होती. जेणे करून निधन झालेल्या मोरे व रोडे या कडवट शिवसैनिकांची नावे यादीत प्रसिद्ध झाली असून ती दुरुस्ती केली आहे. परंतु त्या दोन्ही शिवसैनिकांना शिवसेना विसरू शकत नाही, असे मत मांडून जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांनी सारवासारव केली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/575474654130268/