मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने नवी कार्यकारिणी बनवली आहे. मात्र यात दोन मृत्यू झालेल्या शिवसैनिकांची नियुक्ती पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून विरोधकांकडून टीका होत आहे. मीरा भाईंदर परिसरातील ही कार्यकारिणी आहे. उपविभाग प्रमुख म्हणून नेमलेले प्रकाश मोरे आणि भास्कर रोडे यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. Excitement – Two deceased Shiv Sainiks elected as office bearers Mumbai Mira Bhayander
एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. मीरा भाईंदर शिवसेनेची जम्बो कार्यकारणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी काही महिन्यांपूर्वी कार्यकारणी बरखास्त करायला लावली होती. तर नव्या जम्बो कार्यकारिणीत असलेल्या दोन पदाधिकाऱ्यांचे पूर्वीच निधन झाले असताना त्यांची नावे यादीत आल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आमदार सरनाईक हे संपर्कप्रमुख असताना शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या शिफारसी प्रमाणे होत होती. काही महिन्यांपूर्वी भाईंदर पश्चिम शाखेत सेनेच्या महिला व पुरुष पदाधिकाऱ्यात राडा झाल्या नंतर संपूर्ण शहराची शिवसेना कार्यकारिणी बरखास्त केली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडात आमदार सरनाईक देखील सहभागी झाले. त्यामुळे शहरातील बहुसंख्य नगरसेवक व माजी सेना पदाधिकारी, शिवसैनिक मात्र ठाकरे यांच्या सोबत आहेत, असे तर सध्या चित्र आहे. मातोश्रीवर स्वतः उद्धव ठाकरे यांनी सेना नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने ठाकरें सोबत असल्याचे चित्र आहे. त्यातूनच शिवसेनेची सोमवारी (ता. 4) प्रसिद्ध झालेली जम्बो कार्यकारणी चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान आजच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या यादीतील दोन पदाधिकाऱ्यांचे पूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या विषयावरून विरोधकांकडून टीका होत आहे. प्रभाग १० मधील पदाधिकाऱ्यांच्या यादीत उपविभाग प्रमुख म्हणून नेमलेले प्रकाश मोरे यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर प्रभाग ३ मध्ये उपविभाग प्रमुख नेमलेले भास्कर रोडे यांचे गेल्या वर्षी कोरोना काळात निधन झाले आहे.
● अशी केली सारवासारव
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या पूर्वीच्या याद्या आणि नव्याने तयार केलेली यादी एकत्र पाठवण्यात आली होती. जेणे करून निधन झालेल्या मोरे व रोडे या कडवट शिवसैनिकांची नावे यादीत प्रसिद्ध झाली असून ती दुरुस्ती केली आहे. परंतु त्या दोन्ही शिवसैनिकांना शिवसेना विसरू शकत नाही, असे मत मांडून जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांनी सारवासारव केली आहे.