□ वरुडा आश्रम शाळेतील घटना
सोलापूर – खेळताना कट्ट्यावरून पडल्याने ७ वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावला. ही घटना वरुडा (जि. उस्मानाबाद) येथील शासकीय आश्रम शाळेत काल सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. 7-year-old student dies after falling from a bench while playing Solapur Osmanabad
शंकर विकास काळे (वय ७ रा. उस्मानाबाद) असे मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो वरुडा (जि. उस्मानाबाद) येथील शासकीय आश्रम शाळेत पहिल्या इयतेत शिकण्यास होता. काल सकाळी १० वाजेच्या सुमारास तो इतर विद्यार्थ्यांसोबत विटी दांडू खेळत होता. त्यावेळी कट्ट्यावरून पडल्याने डोकीस मार लागून जखमी झाला होता. त्याला तेर त्यानंतर उस्मानाबाद येथे प्राथमिक उपचार करून अर्जुन शेगार (काळजीवाहक) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो रात्री मरण पावला. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.
● बचेरी येथे शेतकऱ्याच्या घरात चोरी; ३ लाखाचे यंत्र गायब
सोलापूर – बचेरी (ता.माळशिरस) येथे ठिबक सिंचनासाठी शेतात आणून ठेवलेल्या खोलीचे कुलूप तोडून चोरट्याने ३ लाख २९ हजाराचे यंत्रसामग्री पळविली.
यासंदर्भात अमोल दत्तात्रय देशमुख (वय ३४ रा.बचेरी) यांनी माळशिरस पोलिसात फिर्याद दाखल केली. चोरट्याने त्यांच्या शेतातील खोलीचे कुलूप तोडून आतील सँड फिल्टर, सँड फिल्टर असेंब्ली, व्याक्युम ब्रेकर आदी यंत्रे सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरून नेले. असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे. पोलीस नाईक खरात पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/576077554069978/
□ बंगल्याच्या बाहेरील दरवाजाला कोंडी लावून केली घरपोडी; नातेपुते येथे २ लाखाचा ऐवज लंपास
सोलापूर – नातेपुते (ता.माळशिरस) येथे बंगल्याच्या दरवाज्याचे गेटचे कुलूप तोडून चोरट्याने घराच्या बाहेर बाहेरील दरवाजांना कोंडी लावून कपाटातील रोख रकमेसह १ लाख ९० हजाराचे दागिने पळविले. ही चोरी सोमवारी (ता. ४) पहाटेच्या सुमारास घडली.
नातेपुते येथील उमाजी नाईक नगरात आदिनाथ ईश्वरदास देवकर हे राहण्यास आहे. नेहमीप्रमाणे ते जेवण करून रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत झोपले होते. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्याच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून अंगणात प्रवेश केला. आणि सर्व खोल्याना बाहेरून कोंड्या लावल्या. त्यानंतर बेडरूमच्या खोलीतील कपाट उचकटून त्यातील १६ हजार रुपये रोख आणि दागिने असा एकूण १ लाख ९० हजाराचा ऐवज घेऊन पसार झाले.
सकाळी उठल्यानंतर देवकर यांनी दरवाजा उघडण्याच्या प्रयत्न केला तेंव्हा बाहेरून कोंड्या लावल्याचे आढळले. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी नातेपुते पोलिसात पर्यादि दाखल केली. पुढील तपास हवालदार तळेकर करीत आहेत.
□ इंदिरा नगरात दिवसा घरफोडी, २५ हजाराची रोकड लंपास
सोलापूर – आतून बंद असलेल्या दरवाजाची कडी-कोंडा ऊचकटून चोरट्याने कपाटातील २५ हजाराची रोकड पळवली. ही घटना विजापूर रोडवरील इंदिरा नगरात काल मंगळवारी (ता.5) दुपारच्या सुमारास घडली.
यासंदर्भात नसीर रफिक जहागीरदार (रा. इंदिरानगर) यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दाखल केली. काल दुपारी दोन वाजेच्या सुमारात ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. रात्री परतल्यानंतर त्यांना घराच्या पाठीमागील दरवाजाचे कडीकोंडा उचकटून कपाटातील रोकड गायब झाल्याचे दिसून आले. त्याप्रमाणे त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. हवालदार तोडणुर पुढील तपास करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/575997100744690/