सोलापूर / पंढरपूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्तांतर घडले आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर १८ वर्षांनंतर सत्तांतर झाले. डीव्हीपी उद्योग समूहाचे तथा धाराधिव कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील गटाची सत्ता आली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे. Bhalke’s power terminated; Sattantar Pandharpur Solapur on Vitthal Sahakari Sugar Factory
भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. कारखान्याचे संस्थापक औदुंबर पाटील यांचे नातू युवराज पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकाच्या निकालामुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे.
साखर कारखान्याच्या सहा ऊस उत्पादक गटातून २००० मतांच्या आघाडीने वीस जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी आघाडीला संस्था प्रतिनिधी मतदार संघातील एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारतनाना भालके यांची गेल्या १८ वर्षापासून विठ्ठल कारखान्यावर सत्ता होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे कारखान्याचे अध्यक्ष झाले होते. विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ते भूमिगत झाले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपुरात आल्यानंतर त्यांनीच भगिरथ भालके नॉटरिचेबल असल्याचे म्हटले होते.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल सकाळी ८ वाजल्यापासून पंढरपूर शासकीय गोदामात सुरू झाली होती. रात्री १० वाजेपर्यंत अभिजित पाटील युवराज पाटील यांच्या गटात कट्टे की टक्कर असल्याचे दिसून आले. चेअरमन भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांचे पॅनल तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचे कल हाती आले आहेत.
धाराधिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या पॅनलने भाळवणी आणि करकंब गटातून काल आघाडी घेतली होती. तर मेंढापूर आणि तुंगत गटातून संचालक युवराज पाटील यांचे पॅनल पुढे असल्याचे चित्र होते. अभिजित पाटील आणि युवराज पाटील यांच्यात थोडक्या मताची आघाडी असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती.
या निवडणुकीत सत्ताधारी भालके – काळे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता कालच रात्रीपासूनच व्यक्त होत आहे. अजून कासेगाव आणि सरकोली गटाची मतमोजणी बाकी आहे. भालके गटाचे संस्था मतदारसंघात समाधान काळे यांचा विजय झाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ आषाढी एकादशीनिमित्त सोलापूरकरांना सांगितिक मेजवानी; सोलापूरकरांनी लाभ घेण्याचे आवाहन
सोलापूर : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता.९) सायंकाळी ५.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात ‘तीर्थ विठ्ठल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापूरकरांना सांगितिक मेजवानी मिळणार आहे.
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला वीर इव्हेंट्स आणि विश्वविनायक प्रतिष्ठान यांच्याकडून पी. एन. रिअल इस्टेट कंपनी प्रस्तुत, सोलापूरकर रसिकांसाठी ‘ तीर्थ विठ्ठल’ हा कार्यक्रम होणार आहे. मराठी मालिका-चित्रपट सृष्टीतील प्रख्यात पार्श्वगायक आणि
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आजोळघरचे वंशज अवधूत गांधी आणि सहकारी हा कार्यक्रम सादर करतील.
फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या चित्रपटाचे संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन नागेश भोसेकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशपत्रिका पुढील ठिकाणी मिळतील. पी.एन. रिअल इस्टेट कंपनी – ९१५८०५२१७९ , जोगेश्वरी सोलार – ९८९०६७५७६७, वीर इव्हेंट्स – ९९२१०३२३२५, विश्वविनायक प्रतिष्ठान – ९९६०९८३३८८, कुलकर्णी मसाले – ८९२८५१५२५३, होमी हाऊस, मधला मारुती – ०२१७२७४०५६२, गीतांजली पेंट, कसबा गणपती समोर, बाळीवेस – ७३७८९४०५६५
या कार्यक्रमास प्रवेश मोफत असून प्रवेशिका बंधनकारक असणार आहे. सोलापूरकरांनी सदर सांगीतिक पर्वणीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन वीर इव्हेंट्स आणि विश्वविनायक प्रतिष्ठान यांच्याकडून करण्यात आले आहे.