पंढरपूर : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात आला असतानाच कोरोनाचे संकट यात्रेवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आज पंढरपुरात 6 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे आषाढी यात्रेवर कोरोनाचे सावट दिसून येत आहे. हे सावट गडद होण्याअगोदर खबरदारी आणि काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. Corona’s death on Ashadi Yatra; 6 new patients, 39 patients undergoing treatment, CM invited Pandharpur Solapur
सध्या पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आहे. अनेक मठ आणि धर्मशाळेत भाविक राहत आहेत. अनेक छोट्या मोठ्या पालखी , दिंडीचे आगमन पंढरपुरात झाल्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षापासून यात्रा न भरल्यामुळे पंढरपूरचे अर्थकारण पूर्णपणे ठप्प झाले होते. यंदा व्यापाऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर माल खरेदी केला आहे. यात्रा चांगली होण्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. असे असले तरी आता सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.
□ पंढरपुरात ३९ कोरोना रुग्णांवर उपचार
आषाढी यात्रेची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असताना कोरोनाचा प्रभाव सोलापूर जिल्ह्यात केवळ पंढरपूरमध्ये वाढताना दिसतोय. सध्या पंढरपुरात कोरोनाचे ३९ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भाविकांनी शक्यतो मास्कचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झालीय आहे. टेस्टिंग आणि लसीकरणासाठी पंढरपुरात ८ औषधोपचार ठिकाणी सोय करण्यात आली आहे तर ग्रामीण भागात २३ ठिकाणी सोय करण्यात आली आहे. तसेच पंढरपूर लागत ८ ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन केल्याची माहिती डॉ एकनाथ बोधले यांनी दिली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/575686417442425/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 विठ्ठल मंदिर समितीचे मुख्यमंत्र्यांना महापूजेचे आमंत्रण
सोलापूर – कोरोना महामारीनंतर आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. जगतगुरू तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वरांसह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहचेल. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पांडुरंगाची शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात. ती सर्वोच्च शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून श्री विठ्ठल- रूक्मीणी मंदिर समितीच्या वतीने त्यांना आमंत्रण देण्यात आले असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जावून आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यावेळी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन त्यांचा सन्मान केला.
याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प.श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अधिकारी, गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य उपस्थित होते.
□ विठ्ठलाची महापूजा करणारे एकनाथ शिंदे आठरावे मुख्यमंत्री
आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय पूजेची प्रथा संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सुरू झाली. मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची महापूजा करण्याचा पहिला मान तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना प्राप्त झाला होता. त्यांच्यासह राज्यातील सोळा मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली आहे. ही पूजा करणारे उद्धव ठाकरे सतरावे मुख्यमंत्री, ठरले तर एकनाथ शिंदे आठरावे मुख्यमंत्री आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/575472284130505/