□ तिन्ही पॅनलने व्यक्त केला विजयाचा विश्वास
पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मतदानासाठी मंगळवारी (ता. 5) सकाळी आठ वाजल्यापासूनच सुरुवात झाली. सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळाली. पहिल्यांदाच तिहेरी निवडणूक झाल्याने चुरस वाढली होती. जवळपास ८९% मतदान झाल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुशीलकुमार बेल्हेकर यांनी सांगितले. Bhalke Patil Pandharpur 89% turnout for Vitthal Co-operative Sugar Factory
चेअरमन भगीरथ भालके, धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, संचालक युवराज पाटील यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना विजयाचा व्यक्त केला. शेतकरी सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे. स्व भारतनाना भालके यांच्यानंतर सभासद माझ्यावर विश्वास टाकतील, असा आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवला.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमन यांनी गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल दिले नाही. स्वतः चेअरमन नॉट रिचेबल असल्यामुळे गेल्या दोन वर्षात सभासदांत जाऊन त्याच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या सोडवल्या. विठ्ठल कारखाना बंद असल्याने सभासदांचा ऊस सांगोला कारखान्यात गाळला. त्यामुळे शेतकरी सभासद माझ्यामागे उभा राहील, असा विश्वास धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मतदानाचा हक्क बनजवल्यानंतर व्यक्त केला.
स्व औदुंबर पाटील, स्व यशवंत पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सभासद आशीर्वाद देतील अशी भावना संचालक युवराज पाटील यांनी व्यक्त केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/575852957425771/
शेतकऱ्यांचा ‘राजवाडा’ अशी ओळख असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सर्वच राजकीय नेत्यांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. त्यामुळं हा कारखाना काबीज करण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरवर्षी 10 ते 12 लाख टन उसाचं गाळप करणारा कारखाना बंद असल्यानं पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हा करखाना बंद असल्यामुळं सत्ताधारी भालके गटावर विविध प्रकारचे आरोप होत आहेत. सध्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे आहेत. त्यांच्या जोडीला चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आहेत.
□ 100 वर्षाच्या आजीने केले मतदान
वाखरी (ता. पंढरपूर) येथील गोकुळा सुखदेव सलगर या 100 वर्षीय आज्जीनी देखील या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या आज्जी आजारी असताना त्या मतदानाचा हक्क बजावण्याकरिता आल्या होत्या.
https://www.facebook.com/109399567404448/posts/575694784108255/