सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांच्या कार्याविषयी कवी राघवन यांचा नऊ अध्याय असलेला सुमारे ४० पानांचा ग्रंथ हिरेहब्बू वाड्यात एका सागवानी पेटीमध्ये पूजेसाठी ठेवण्यात आला होता. Scuba diver finds books thrown in water by thieves, MLA Deshmukh on the spot in Solapur
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यांचा ताम्रपटावर अच्चकन्नड भाषेत लिहिलेला 50 पानी आत्मचरित्राची चोरी झाली. ही घटना उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यात गुरुवारी (30 जून) रात्री ११.३० नंतर घडली. दरम्यान, पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळी सहाच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास चोरट्यांनी वाड्यात प्रवेश करुन हा ग्रंथ तसेच पितळी दिवा, तांबा धातूच्या तांब्या असा ऐवज पळवून नेला. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास सागर हिरेहब्बू हे पूजा करीत असताना चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती हिरेहब्बू यांनी फौजदार चावडी पोलिसांना दिली होती.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोन्ही चोरांनी संबंधित ग्रंथ हा महापौर निवास परिसरातील एका बांधकाम चालू असलेल्या पाणी साठलेल्या खड्ड्यामध्ये टाकले आहेत असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अग्निशामक दलाला बोलवून स्कुबा डायव्हींग करणाऱ्या इसमांकडून हे ग्रंथ पाण्यामध्ये शोध कार्य सुरू आहे परंतु ग्रंथ काही सापडत नाहीत असे चित्र पहायला मिळाले. आमदार विजय देशमुख, राजशेखर हिरेहब्बू हे त्या घटनास्थळावर बराच वेळ थांबून होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/575933147417752/
□ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे महिला वारकऱ्यास मिळाली तातडीने सेवा
सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात सोमवारी (4 जुलै ) प्रवेश झाला. दुसऱ्याच दिवशी मंगळवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम नातेपुते येथे होता. जिल्हा परिषद आरोग्य विभागाची पथके आपापल्या नेमून दिलेल्या ठिकाणी कार्यरत होती.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव हेसुद्धा पालखी मार्गावरील आरोग्य सेवेचा आढावा घेत फिरत होते. तेंव्हा नातेपुते जवळीक राऊत वकील वस्ती येथे आले असता त्यांना एका साठ वर्षाच्या महिला वारकऱ्याची तब्येत बिघडली असल्याचे समजले. शशिकला तुकाराम चालक असे या महिला वारकऱ्याचे नाव असून ती लाहोरी येथील रहिवासी आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तातडीने पालखी मार्ग आरोग्य सेवेसाठी तयार केलेल्या *मिशन व्हाट्सअप ग्रुप वर’ संदेश दिला. रात्री 8-15 वाजता संदेश दिल्या बरोबर नातेपुते येथून 9-00 वाजता रूग्णवाहिका राऊत वकील वस्ती येथे पोहोचली व ग्रामीण रुग्णालय नातेपुते येथे 9-30 वाजता या महिला वारकऱ्यावर उपचार सुरू झाले. सध्या या महिला वारकऱ्याची तब्येत स्थिर आहे.
गर्दीतून वाट काढत तासाभरात रुग्णावर उपचार सुरू झाले आणि पुढील गुंतागुंत टळून त्या महिला वारकऱ्याचा जिव वाचला. आरोग्य विभागाच्या या तत्पर सेवेबद्दल वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी सुध्दा माळशिरस तालुक्यात दौऱ्यावर होते. ही घटना समजताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांच्यासह आरोग्य विभागाच्या संपूर्ण टीमचे कौतुक करुन अभिनंदन केले.
याकामी डॉ. प्रणव सातव वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय नातेपुते, अजिया शेख स्टाफ नर्स, आरोग्य सहाय्यक राजू शेख, आरोग्य सहाय्यक ए.बी.धाईंजे, आरोग्य सेवक एस.आर.गुजरे यांनी महिला वारकऱ्याच्या उपचारासाठी परिश्रम घेतले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/575686417442425/