● ‘मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री’, मुख्यमंत्री
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी (७ जुलै ) मुख्यमंत्री पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यानिमित्ताने मुख्यमंत्री कार्यालयात पूजा ठेवण्यात आली होती. पहाटेपासून या पूजेसाठी जय्यत तयारी सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला. In preparation for a special scheme for rickshaw pullers, Chief Minister Eknath Shinde took charge
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश आदी उपस्थित होते. यावेळी आमदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या.
मंत्रालयात आगमन केल्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील दालनासमोर मुख्यमंत्र्यांचे औक्षण केलं. मुख्यमंत्री शिंदेंच्या दालनात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो लावण्यात आला आहे. कार्यभार स्वीकारल्यावर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सचिवांशी चर्चा केली. सर्व घटकांना सोबत घेऊन गतिमान पद्धतीने कारभार करण्यावर भर देण्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/576618237349243/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्मथनार्थ आज ठाण्यात रिक्षावाल्यांकडून रॅली काढण्यात आली होती. एक रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा प्रवास शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना समर्थन आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ठाण्यातील रिक्षाचालकांनी एकत्रित येऊन महापालिका मुख्यालय येथे जमून घोषणाबाजी केली. तसंच संपूर्ण शहरात रॅली काढली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील रिक्षावाल्यांसाठी खास प्लॅन करण्याच्या तयारीत आहेत. बससाठी स्वतंत्र आगार असतं, मात्र रिक्षावाले बाहेर उन्हात असतात. या रिक्षावाल्यांसाठी एसटी आगाराच्या परिसरात तात्पुरता का होईना, काही निवारा करता येईल का, यासाठी एखादी योजना ते तयार करणार आहेत,’ अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असे मोठे विधान दीपक केसरकर यांनी केले आहे. आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू. मात्र, आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावेत. दरम्यान आता आम्ही भाजपासह असल्यामुळे त्यांच्यासोबतही संवाद साधावा लागेल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
□ मुख्यमंत्री शिंदेंचा खासदार जलील यांना इशारा
औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरून आक्रमक झालेल्या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आले असले तरी ठाकरे सरकारच्या या निर्णयाबाबत मात्र कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.
औरंगाबादचे नाव संभाजी नगर केल्यास कायदेशीर लढाई लढण्याबरोबरच रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील जलील यांनी दिला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार असो किंवा खासदार कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही, कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही यासाठी सरकार सक्षम असल्याचा इशाराच शिंदे यांनी एमआयएमला दिला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/576596997351367/