मुंबई : ‘काय झाडी, काय डोंगार आणि हाटील… ‘या डायलॉगने चर्चेत आलेले आमदार शहाजी बापू पाटील हे मुंबईत आमदार निवासात असताना सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. आकाशवाणी आमदार निवासात शहाजीबापू पाटील यांची रूम आहे. या रूममधील छताचा काही भाग बुधवारी मध्यरात्री कोसळला. ही दुर्घटना घडली तेव्हा शहाजी बापू पाटील हे आपल्या रूममध्येच होते, असे सांगितले जात आहे. The roof of the MLA’s residence collapsed, fortunately Shahaji Bapu briefly escaped the bushes
‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल एकदम ओक्केमध्ये आहे समंद’, या एका डॉयलॉगमुळे शहाजीबापू पाटील अख्ख्या महाराष्ट्रात सध्या चर्चेत आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शहाजीबापू पाटील गुवाहाटीमध्ये तळ ठोकून होते. तेव्हा अनेक दिवसांपासून शहाजी पाटील यांच्याशी संपर्क न झालेल्या एका कार्यकर्त्याने त्यांना फोन केला.
यावेळी आपण आहात कुठे अशी विचारणा कार्यकर्त्याने केली. त्यावर ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, ओके मधी हाय सगळं’ असे शहाजी यांनी आपल्या गावरान भाषेत गुवाहाटीचे वर्णन केले होते. त्यांच्या या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. यावरून सोशल मीडियावर मिम्स सुद्धा तयार करण्यात आले. तसेच मराठी यूट्यूबर शंतनू पोळे या तरुणाने शहाजी पाटील यांच्या डायलॉगला संगीत देत भन्नाट गाणे तयार केले. ते गाणेही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/576618237349243/
शहाजीबापू पाटील यांच्या मुंबईतल्या आमदार निवासातील खोलीचे छप्पर खाली कोसळल्याने अपघात झाला. जेव्हा ही घटना घडली. तेव्हा शहाजीबापू खोलीमध्येच होते, अशी माहिती आहे. पण, सुदैवाने त्यांना दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत. या घटनेचे काही फोटो समोर आले आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे छताचा काही भाग हा शहाजीबापू यांच्या बेडवरच कोसळ्याचे फोटोतून दिसून येत आहे.
दक्षिण मुंबईत मंत्रालयाजवळच्या आकाशवाणी आमदार निवासात शहाजीबापू पाटील यांची खोली आहे. बुधवारी आमदार निवासात आल्यानंतर ते आपल्या खोलीकडे विश्रांतीसाठी गेले. तेव्हा दरवाजा उघडून खोलीत प्रवेश करताच छताचा काही भाग खाली कोसळला.
सुदैवाने ते या घटनेतून थोडक्यात वाचले. या घटनेचे काही फोटो समोर आले आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे छताचा काही भाग हा शहाजीबापू यांच्या बेडवरच कोसळ्याचे फोटोतून दिसून येत आहे.
□ शिंदे महाराष्ट्रातील राजकारणाचे ‘मॅराडोना’
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना शहाजीबापू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मॅराडोना असा उल्लेख केला होता. ते म्हणाले, मला सभागृहातच बोलायचं होतं. पण संधी मिळाली नाही. आता इथं सांगतो. फुटबॉलपटू मॅराडोना यांनी ज्यावेळी फुटबॉल खेळायचं सोडलं तेव्हा जागतिक स्पर्धा झाली होती. त्यामधील मॅराडोना याने केलेला गोल, आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहे. त्याने कसा गोल केला हे कुणालाच नाही समजले. मॅराडोना गेला कसा आला कसा अन् वळला कसा अन् गोल केला कसा? हे कुणालाच नाही कळलं. एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील राजकारणातील मॅराडोना आहेत, असे पाटील यांनी म्हटले होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/576304550713945/