□ एस टी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय
अक्कलकोट : अक्कलकोट आगारातील एकूण सध्या ७० एसटी बसेस आहेत. त्यापैकी ६ बसेस टायरअभावी थांबून आहेत. यामुळे शालेय विद्यार्थी, प्रवाशांसह भाविक भक्तांची गैरसोय होत आहे. Inconvenience to students; Six buses stopped at Akkalkot depot due to lack of tires
ग्रामीण भागातील अक्कलकोट ते दहिटणेवाडी, चप्पळगाववाडी, हालहळ्ळी (अ), तीर्थ या मार्गावरून वळसंगपर्यंत जाणारी बस गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे या परिसरातील शालेय विद्यार्थी, प्रवाशी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांचे अतोनात हाल होताना दिसत आहे. या होणाऱ्या गैरसोयीकडे वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून या बसेस धूळखात पडून आहूत. पुढच्या व मागच्या टायरअभावी सहा बस थांबून असल्याने आत्तापर्यंत सरासरी सोळा लाख, वीस हजार रुपये एस टी महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. अक्कलकोट ते पुणे दोन फेऱ्या, अक्कलकोट ते नगर, वागदरी ते कुर्ला व एक विना थांबा, त्याच बरोबर ग्रामीण भागातील अक्कलकोट ते हालहळ्ळी(अ)मार्गे वळसंग, तोळनूर, निंगदळी, म्हैसलगी मुक्काम बस बंद असल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी आदींना एसटी बस नसल्याने प्रवाशी शेतकऱ्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी गैरसोयबरोबरच उत्पन्नावर परिणाम होत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/576661274011606/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मी खेडगी कॉलेजात शिकत आहे. एस टी बस बंद असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मिळेल त्या खाजगी वाहनाने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे कॉलेजला वेळेवर पोहचता येत नाही. त्यामुळे माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया राजश्री बिराजदार (विद्यार्थींनी, हालहळ्ळी (अ)) हिने प्रतिक्रिया दिलीय.
याविषयी अधिक माहिती देताना रमेश मंता (अक्कलकोट आगारप्रमुख) म्हणाले, सध्या बस डेपोत टायर अभावी काही बसेस थांबून आहेत. यासंदर्भात वरिष्ठाकडे पाठपुरावा सुरू आहे. टायर उपलब्ध झाल्यास एस टी बस पूर्ववत करण्यात येईल, असे सांगितले. याचा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुक्यातील प्रवाशांची होणाऱ्या गैरसोयी दूर करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
“या संदर्भात जिल्हा आगार प्रमुख यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. टायर व बॅटऱ्या उपलब्ध झाल्यावर प्रथम प्राधान्य अक्कलकोट तालुक्याला देण्यात येणार आहे. त्यामुळे होणाऱ्या गैरसोयी लवकरच दूर करू”
सचिन कल्याणशेट्टी – आमदार, अक्कलकोट
https://www.facebook.com/109399567404448/posts/576596997351367/