पंढरपूर – आषाढी सोहळ्यासाठी दहा लाख भाविक पंढरपूरला आले असावेत, असा अंदाज आहे. दरम्यान दशमी दिवशी भरपावसात पालखी सोहळ्यांनी वाखरीतून प्रस्थान ठेवून पंढरपूर शहरात प्रवेश केला. आषाढ महिन्यात देवशयनी एकादशी आणि कार्तिक महिन्यात प्रबोधनी एकादशी हे विठोबाचे सर्वात महत्त्वाचे उत्सव आहेत. Ashadi Yatra: It is estimated that ten lakh devotees arrived in Pandharpur with a crown of two kilos of gold
खरे दोन दिवस नवमी व दशमी ला पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली असली तरी वारीचा उत्साह कमी नाही. दर्शनरांग पत्राशेडपर्यंत गेली होती. सकाळी पंढरपूरला आलेल्या मानाच्या पालख्या वाखरीत जेथे संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालख्या मुक्कामी होत्या तेथे दाखल झाल्या होत्या. येथे संतभेटीचा कार्यक्रम झाला. यानंतर सर्वच पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवले.
पंढरपूर शहरात 65 एकर भागात दीड लाखाहून अधिक भाविकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. तेथे प्रशासनाने सुरक्षा, आरोग्य, पाणी, शौचालयं याची व्यवस्था चोख ठेवली आहे. दरम्यान शहरातील मठ , भक्तनिवास, लॉज तसेच गावभागात घरोघरी वारकरी उतरले आहेत. यासह मोकळी पटांगण ही वारकर्यांच्या राहुट्या व वाहनांनी भरून गेले आहेत. आषाढी यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून शहरात पोलिसांनी जवळपास पाच हजार पोलीस तैनात केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकादशीची शासकीय महापूजा करणार आहेत. दरम्यान मंदिरे समितीच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेत चहा, फराळाचे वितरण केले जात आहे. आज शनिवारी दशमी दिवशी पंढरीत भाविकांची गर्दी वाढल्यानंतर चंद्रभागा पात्रातही स्नानासाठी वारकरी मोठ्या संख्येने येत होते. वाळवंट व घाटांवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरात भक्तांसाठी युगानुयुगे विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला पाहण्यासाठी दरवर्षी ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता, हजारो किलोमीटरची पायपीट करून मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने असंख्य वारकरी पंढरपूरला येतात. पंढरपूरला नित्यनेमाने येणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात मागील दोन वर्षापासून चुकत असलेल्या वारीबद्दल हुरहूर होती.
https://www.facebook.com/109399567404448/posts/577884637222603/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/578096310534769/
□ नांदेडच्या व्यापा-याकडून श्री विठ्ठल – रूक्मिणी मातेसाठी दोन किलो सोन्याचे मुकुट
पंढरपूर : उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या,दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरात भक्तांसाठी युगानुयुगे विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या चरणी अधूनमधून सोन्या-चांदीच्या वस्तू आणि दागिने भाविक अर्पण करत असतात. पण नांदेडमधील व्यापा-याने दोन किलो सोन्याचे आकर्षक मुकुट बनवून दिले आहेत.
उमरी (जि.नांदेड) येथील प्रसिध्द व्यापारी विजय पंढरीनाथ उत्तरवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीसाठी सुमारे दोन किलो सोन्याचे (किंमत सुमारे एक कोटी तीन लाख) अत्यंत आकर्षक मुकुट बनवून घेतले आहेत. विठ्ठल रखुमाईसाठी त्यांनी 1 कोटी रुपयांचे शुद्ध सोन्याचे मुकुट बनवले आहेत. आषाढी एकादशीला उत्तरवार कुटुंब पंढरपुरात जाऊन हे मुकुट अर्पण करणार आहेत.
आई-वडिलांच्या इच्छेनुसार बनवलेले हे मुकुट आषाढी एकादशी दिवशी श्री व सौ. उत्तरवार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सुपूर्त करणार आहेत, अशी माहिती येथील प्रसिध्द व्यापारी विठ्ठल कटकमवार यांनी ही माहिती दिली.
पंढरपुरातील प्रसिद्ध व्यापारी विठ्ठल कटकमवार यांचे मामा विजय उत्तरवार हे उमरी (जि. नांदेड) येथील सोन्याचे प्रसिध्द व्यापारी आहेत. त्यांच्या आई-वडिलांची श्री विठ्ठल रुक्मिणीसाठी सोन्याचे मुकुट अर्पण करण्याची इच्छा होती. त्यानुसार विजय उत्तरवार आणि त्यांच्या मुलांनी इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/578087207202346/
खामगाव येथून खास कारागीर बोलावून त्यांनी विठुरायासाठी आणि श्री रुक्मिणीमातेसाठी अत्यंत आकर्षक असे दोन मुकुट बनवून घेतले आहेत. विठुरायासाठीच्या मुकुटासाठी सुमारे ११८४ ग्रॅम तर श्री रुक्मिणीमातेच्या मुकुटासाठी सुमारे ७८४ ग्रॅम, असे दोन्ही मिळून १९६८ ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे. हे मुकुट आषाढी एकादशी दिवशी सौ. उत्तरवार दांम्पत्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सुपुर्त करणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी सकवारबाई, संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, शिंदे सरकार, अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस यांनी अनेकदा श्री विठ्ठल-रुक्मिणीला हे मौल्यवान दागिने अर्पण केले आहेत.
आतापर्यंत पांडुरंगाला दिलेल्या मुकुटांची संख्याही जास्त आहे. मुकुंटांची एकूण संख्या सहा सोन्याचे मुकुट आहेत आणि तीन-चार चांदीचे, सोन्याचे पाणी दिलेले मुकुट आहेत. सगळ्या मुकुटांत अमूल्य असा हिऱ्यांचा मुकुट आहे. त्याला सूर्यकिरणांचा मुकुट म्हणतात.
यामध्ये सोन्याची शिंदेशाही पगडीही आहे. पाडव्याला चांदीची काठी, खांद्यावर घोंगडी, धोतर, पगडी असा विठ्ठलाचा पोशाख असतो. पगडीवर बसवण्यासाठी रत्नजडित शिरपेच आहेत. अतिशय पुरातन आणि मौल्यवान पाचू, हिऱ्यांनी मढवलेले आहेत. सोन्या-मोत्यांचे तुरे आहेत. देवाची ओळख ज्या मकरकुंडलांमुळे होते ती कानात घालण्याची सोन्याची मकरकुंडले आहेत. यामध्ये माणिक आणि पाचू जडवलेले आहेत. कपाळावर किमती नील आणि हिरे बसवलेला नाम म्हणजे सोन्याचा गंध आहे.