सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले माजी महापौर महेश कोठे यांनी आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरात भेट घेतली. त्यामुळे महेश कोठे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या. मात्र याबाबत महेश कोठे यांनी आपली माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. I went to NCP for Eknath Shinde’s felicitation: Mahesh Kothe’s explanation
महेश कोठे यांनी आपण शिंदे गटात सामील झालेलो नाही मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यात आलेले आहेत ते एकेकाळी माझ्या पक्षाचे सहकारी होते त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण पंढरपूर येथे गेलो होतो, असे सांगत आपण राष्ट्रवादीतच जाणार असल्याचे कोठे यांनी ठामपणे सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांची कोठे यांनी भेट घेतल्यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले होते. महेश कोठे शिंदे गटात सामील झाल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या. त्यामुळे महेश कोठे यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या लोकांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती. अखेर याबाबत महेश कोठे यांनीच खुलासा केला. ते म्हणाले की, आपण शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांनी आम्हाला चांगले सहकार्य केले होते. स्टॅंडिंग कमिटी चेअरमन निवडतानाही त्यांनी स्टे आणून मदत केली होती. तेच आज मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचे स्वागत करणे माझे कर्तव्य आहे मी शिंदे गटात सामील झालेलो नाही मी राष्ट्रवादीतच जाणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/578586813819052/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/578895030454897/
□ सोलापुरात शिवसेनाचा मोठा गट शिंदे गटात सामील, फोटो व्हायरल
सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरात श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेस रात्री उशिरा दाखल झाले. आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. त्यानंतर स्थानिक शिवसेनेला त्यांनी चांगलाच झटका दिला. शिवसेनाचा मोठा गट शिंदेंच्या गटात सामील झाल्याचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाले.
सोलापूर महापालिकेतील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, इतर चार-पाच माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी यांना फोडून शिंदे गटात सामील करून घेतले आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे स्वागत केले आहे.
राज्यात मोठे सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत उघड उघड दोन गट पडले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुसरा गट तयार झाला आहे. शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदारांचा शिंदे यांना पाठिंबा असल्याने शिवसेना नेमकी कोणाची, असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला आहे.
सोलापूर महापालिकेतील काही माजी पदाधिकारी, पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील पक्षाचे पदाधिकाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भेट घडवून त्यांना पाठिंबा जाहीर करायला लावला. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. शिवसेनेत नगरसविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी मोठी मदत केली होती. त्यामुळे आम्ही त्यांना मुख्यमंत्री झाल्याच्या शुभेच्छा द्यायला गेलो होतो, असे त्यातील काहींनी सांगितले. पण, आगामी काळात पक्षांतर्गत राजकारणामुळे ते पदाधिकारी निश्चितपणे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत दिसतील, अशीही चर्चा आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/578587140485686/