सोलापूर : आषाढी वारीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरात दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या चार पिढ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे प्रत्यक्षात दर्शन घेतले .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सुविद्य पत्नी लता एकनाथ शिंदे यंदाचे मानाचे मानकरी बीड येथील वारकरी मुरली भगवान नवले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी जिजाबाई मुरली नवले या दाम्पत्यांच्या शुभहस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा थाटात संपंन्न झाली. Chief Minister’s visit to Manish Kalje’s office, won the hearts of activists Solapur Pandharpur
हि महापूजा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे आपल्या कुटुंबासमवेत परतत असताना पंढरपूरहून सोलापूरात दाखल झाले. सोलापुरतील विश्वासू समर्थक मनीष काळजे यांच्या सेवालय कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थाटात झाले.
मनीष काळजे समर्थकांनी सेवालय कार्यालयाच्या बाहेर मुख्यमंत्र्यांचे स्वागतपर बॅनर लावले होते. ढोल – ताशाच्या गजरात फुलांची पुष्पवृष्टी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी काळजे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे सोलापूरात आल्याने शिंदे समर्थकांनी सेवालय कार्यालयाच्या बाहेर गर्दी केली होती.
यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शिंदे गटात नुकतेच प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, मनोज शेजवाळ , उमेश गायकवाड,यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुष्पहार घालून स्वागत केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/579070977103969/
दरम्यान सेवालय कार्यालयाच्या उदघाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यालयाची पाहणी केली. यावेळी सेवालय संपर्क कार्यालयात हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर अनंत दिघे ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आमदार तानाजी सावंत यांचे फोटो लावण्यात आले होते. हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर स्व. अनंत दिघे यांच्या आशीर्वादाने त्यांना अभिप्रेत असलेल्या कार्याप्रमाणे आगामी वाटचाल राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हे सरकार सर्वसामान्यांचे आपले सरकार असल्याने सर्वसामान्यांच्या तळागाळातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याकडे आपला कल असेल असेही यावेळी शिंदे यांनी सांगितलं. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागा. युवक संघटना बळकट करा. सर्वसामान्यांचे तळागाळातील प्रश्न सोडवण्याकडे वैयक्तिक लक्ष केंद्रित करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काळजी नको, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनीष काळजेंना केलं.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत आमदार तानाजी सावंत,माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, मनीष काळजे ,उस्मानाबादचे नगरसेवक सूरज साळुंखे उपस्थित होते. संपर्क कार्यालयाचे उदघाटन यशस्वी करण्यासाठी दयानंद शिंदे, सुजित खुर्द, निहाल शिवसिंगवाले , अर्जुन शिवसिंगवाले ,सागर राजपूत, योगेश बंबईवाले, उमाकांत कारंडे, राज जगताप यांन परिश्रम घेतले.
मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच सोलापूरला आले. त्यामुळे शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचा माहोल होता. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. पंढरपूरहून सोलापूरला येऊन ते विमानाने मुंबईला जाणार होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता बायकारने ते थेट पार्क चौकात आले. तिथे गर्दी जमली होती. आल्या आल्या कारच्या दरवाजात उभे राहून त्यांनी हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले. तिथे लोकांची निवेदनेही शिंदे यांनी स्वीकारली.
□ चित्र पाहून आनंदी झाले…
गर्दीत शिंदे यांचे हाताने काढलेले चित्र घेऊन आदिल्य विटकर हा तरुण उभा होता. त्या तरुणाकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष गेले. त्याला बोलावून घेतले. ते चित्र पाहून शिंदे भारावून गेले. काढलेले हेच चित्र प्रसारमाध्यमांना दाखवत मुख्यमंत्र्यांचा ताफा विमानतळाकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास शिंदे विमानाने मुंबईला रवाना झाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/578913557119711/