सोलापूर – ग्रामीण पोलिसांनी पंजाबमधून ऑनलाईन मागवलेल्या १२ तलवारी जप्त करून याप्रकरणी ११ आरोपींविरुध्द अक्कलकोट दक्षिण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ९ जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई अक्कलकोट तालुक्यातील जेऊर भागात केली. Online in Solapur
Twelve swords ordered, 11 charged, 9 arrested
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुहास जगताप यांनी धनयंज पोरे, सहायक पोलीस निरीक्षक यांच्या पथकास अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांबाबत कारवाई करण्याबाबत सूचित केले होते. त्यावरून सपोनि पोरे यांच्या पथकास अक्कलकोट तालुक्यातील जेऊर भागामध्ये पंजाब राज्यातून एक इसम अवैधपणे तलवारी मागवून घेवून तो या भागातील लोकांना विक्री करत असल्याबाबतची बातमी मिळाली.
त्याची पडताळणी करण्यासाठी पोरे व पथकाने जेऊर गावात जावून तलवारींची विक्री करणाऱ्या बमलिंग पंचाक्षरी बमगोंडा (रा. जेऊर, उमेश सुरेश इंडे, बुधवार पेठ अक्कलकोट), गौतम अंबादास बनसोडे बंकलगी, शब्बीर हसन नदाफ (दोघे रा. बंकलगी), दक्षिण सोलापूर, मनपाक सिराज मिरगी, नागप्पा सुभाष तळवार, नबीलाल रजाक मळ्ळी (सर्व रा. पानमंगरूळ, ता. अक्कलकोट), राहुल सिद्राम हेळवे, अनिल मल्लिकार्जून हेळवे, रवि सुभाष त्यांनी दिली. चव्हाण, गजाप्पा नागप्पा गजा सर्व (रा. करजगी, ता. अक्कलकोट) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यापैकी नऊजणांना अटक केली.
त्यांचेकडे विचारपूस करता त्यांनी सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतू अधिक विश्वासात घेवून तपास केला असता त्यांनी फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून पंजाब राज्यातून तलवारी मागवून घेतल्याची कबुली दिली. सदरच्या तलवारी या अक्कलकोट तालुक्यातील जेऊर, पानमंगरूळ, करजगी व अक्कलकोट शहरातील तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी गावातील लोकांना विक्री केली असल्याची कबुली दिली.
ही कामगिरी तेजस्वी सातपुते, हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सुहास जगताप, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनंजय पोरे, सहा. फौजदार श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर, सलीम बागवान व भरले, हरीदास पांढरे, पोना रवि माने यांनी पार पाडली आहे.
□ ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा
सोलापूर : ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविला आहे. राजीनाम्याचे कारण समोर आलेले नाही. राजीनामा अर्जात त्यांनी काहीच कारण नमूद केलेले नसल्याचे समोर आले आहे.
शिक्षण विभाग आणि डिसले गुरुजी यांच्यातील वादातूनच त्यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. पण, राजीनामा मागे घेण्यासाठी 3 महिन्यांची मुदत असते. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविला आहे. ७ जुलैला त्यांनी राजीनामा दिला असून तो गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडेही आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यानंतर आता अचानकपणे त्यांनी राजीनामा दिल्याने सगळीकडे चर्चेला उधाण आलं आहे. त्यांनी दिलेला राजीनामा रद्द करण्याची अथवा मागे घेण्याची मुदत तीन महिने असते. त्यामुळे आता शिक्षणविभागाची याबद्दल काय भूमिका असेल आणि डिसले राजीनामा परत घेणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, दोन वर्षांत ते ‘डायट’कडे फिरकलेच नाहीत. त्यांनी ग्लोबल टिचर ॲवार्डची तयारी करण्यातच तो कालावधी घालवला, अशी तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आणि त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला.
तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी चौकशी करून अहवाल तसाच ठेवला. विद्यमान शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी तो अहवाल पुन्हा उघडला आणि त्यांची स्वतंत्र चौकशी करून कारवाईची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली. तत्पूर्वी, त्यांनी अमेरिकेत फेलोशिपला जाण्यासाठी रजा मागितली होती. पण, अपूर्ण कागदपत्रांमुळे त्यांचा अर्ज तसाच प्रलंबित ठेवला होता.
कागदपत्रांची पूर्तता न करताच त्यांनी रजा मागितली होती. पण, त्यावेळी त्यांच्या रजेचा विषय तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहचला आणि त्यांच्या आदेशाने डिसले गुरुजींना रजा मिळाली. त्याचवेळी त्यांनी शिक्षण विभागातील काहींनी माझ्याकडे पैसे मागितले, असा आरोपही केला होता. पण, त्यांना त्याचा पुराव्यानिशी खुलासा करण्याचे पत्र जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आले. त्यावेळी त्यांनी माफीनामा दिला होता.
क्युआर कोड शिक्षण प्रणाली विकसीत करणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना दोन वर्षांपूर्वी ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाला. आता शिक्षण विभाग आणि डिसले गुरुजींमध्ये यांच्यात कलगीतुरा निर्माण झाला आहे. त्यातूनच हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. पण, राजीनामा मागे घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
□ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक – आरक्षण सोडत स्थगित, निवडणुका पुढे जाणार
मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व 284 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीचा आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे.
एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.
ज्या ठिकाणी निवडणूक अधिसूचना निघालेली आहे त्यात आता हस्तक्षेप होणार नाही. पण ज्या ठिकाणी अधिसूचना निघालेली नाही, तिथे मात्र तूर्तास कुठली नवी अधिसूचना नको. मंगळवारी 19 जुलैला आम्ही या सगळ्याबाबत पुढची सुनावणी करु असं कोर्टानं म्हटलं आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 5 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात आज सुनावणी झाली. एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.