पंढरपूर – हॉटेलची जागा खाली करण्यास सांगितल्यामुळे जागा मालकाच्या मुलास चार चाकी वाहनाने धडक देऊन खून केल्याप्रकरणी तालुक्यातील लक्ष्मी टाकळीतील पाच जणांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Three killed a young man in Pandharpur by pretending to have an accident due to a land dispute
या घटनेत रविकांत प्रतापसिंह पाटील याचा मृत्यू झाला असून त्याच्या हत्ये प्रकरणी परमेश्वर देठे, त्यांची दोन मुले रणजीत व प्रशांत, पुतण्या नितीन दिगंबर देठे व हॉटेल कामगार विजय बलभीम कोळेकर (रा.कोर्टी, पंढरपूर) यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची अधिक माहिती अशी , की परमेश्वर देठे यांचा लक्ष्मी टाकळी येथे वैभवराज धाबा असून जागेचे मालक प्रतापसिंह पाटील यांनी त्यांना कराराप्रमाणे जागा खाली करण्याचे सांगितले होते. यावरून दोन्ही कुटुंबात जोरदार वाद सुरू होता. काही दिवसापूर्वी देठे यांना मारहाण देखील झाली होती.
दरम्यान देठे यांनी रविकांत पाटील याची पाळत ठेवली होती.
मंगळवारी (ता. 12) सकाळी रविकांत पाटील हा आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.१३ सी. एच. ९६९२ वरून देगाव मार्गे सोलापूर कडे निघाला होता. याच वेळी त्याच्यावर पाळत ठेवणाऱ्या एम.एच. १४ सी.एस. ७३५१ या इनोवाने त्यास पाठीमागून जोरदार धडक देऊन २०० फूट पर्यंत फरपटत नेत अपघात असल्याचे भासवत खून केला.
तालुका पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तसेच प्रत्यक्षदर्शी कडून माहिती घेतली असता हा अपघात नसल्याचा संशय पोलिसांना आला. या प्रकरणी ही इनोवा चालक याच्याकडे चौकशी केली असता तसेच मयत तरुण याची सविस्तर माहिती घेतली असता देठे व पाटील यांच्यामधील वादाची माहिती मिळाली. अधिक तपासामध्ये हा खून झाला असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे तालुका पोलिसांनी या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/580676376943429/
□ सोलापुरात ऑनलाईन मागवल्या बारा तलवारी, 11 जणांवर गुन्हा, 9 जणांना अटक
सोलापूर – ग्रामीण पोलिसांनी पंजाबमधून ऑनलाईन मागवलेल्या १२ तलवारी जप्त करून याप्रकरणी ११ आरोपींविरुध्द अक्कलकोट दक्षिण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ९ जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई अक्कलकोट तालुक्यातील जेऊर भागात केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुहास जगताप यांनी धनयंज पोरे, सहायक पोलीस निरीक्षक यांच्या पथकास अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांबाबत कारवाई करण्याबाबत सूचित केले होते. त्यावरून सपोनि पोरे यांच्या पथकास अक्कलकोट तालुक्यातील जेऊर भागामध्ये पंजाब राज्यातून एक इसम अवैधपणे तलवारी मागवून घेवून तो या भागातील लोकांना विक्री करत असल्याबाबतची बातमी मिळाली.
त्याची पडताळणी करण्यासाठी पोरे व पथकाने जेऊर गावात जावून तलवारींची विक्री करणाऱ्या बमलिंग पंचाक्षरी बमगोंडा (रा. जेऊर, उमेश सुरेश इंडे, बुधवार पेठ अक्कलकोट), गौतम अंबादास बनसोडे बंकलगी, शब्बीर हसन नदाफ (दोघे रा. बंकलगी), दक्षिण सोलापूर, मनपाक सिराज मिरगी, नागप्पा सुभाष तळवार, नबीलाल रजाक मळ्ळी (सर्व रा. पानमंगरूळ, ता. अक्कलकोट), राहुल सिद्राम हेळवे, अनिल मल्लिकार्जून हेळवे, रवि सुभाष त्यांनी दिली. चव्हाण, गजाप्पा नागप्पा गजा सर्व (रा. करजगी, ता. अक्कलकोट) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यापैकी नऊजणांना अटक केली.
त्यांचेकडे विचारपूस करता त्यांनी सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतू अधिक विश्वासात घेवून तपास केला असता त्यांनी फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून पंजाब राज्यातून तलवारी मागवून घेतल्याची कबुली दिली. सदरच्या तलवारी या अक्कलकोट तालुक्यातील जेऊर, पानमंगरूळ, करजगी व अक्कलकोट शहरातील तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी गावातील लोकांना विक्री केली असल्याची कबुली दिली.
ही कामगिरी तेजस्वी सातपुते, हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सुहास जगताप, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनंजय पोरे, सहा. फौजदार श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर, सलीम बागवान व भरले, हरीदास पांढरे, पोना रवि माने यांनी पार पाडली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/580236030320797/