पंढरपूर :- कुंकू, बुक्क्यासह लाह्यांची मुक्त उधळण करीत महाव्दार काला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवानंतर खर्या अर्थाने आषाढी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते. Kunku, Bukkachi Udhalaan, Mahavdar Kala celebration, conclusion of Ashadi Yatra
संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज यांचे वंशज नामदास व हरिदास घराण्याच्या वतीने महाव्दार काल्याचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. श्री विठ्ठलाचे सेवाधारी असलेल्या पांडुरंग महाराज यांना चारशे वर्षापूर्वी प्रत्यक्ष पांडुरंगाने प्रसादरूपी आपल्या खडावा दिल्याची अख्यायिका आहे. त्यानुसार हरिदास घराण्यातील अकरा पिढ्यापासून महाव्दार काला साजरा केला जातो.
आज गुरूवारी परंपरेनुसार हरिदास यांच्या काल्याच्या वाड्यात दुपारी अकरा वाजता संत नामदेव महाराजांचे वंशज दिंडी घेवून दाखल झाले. यावेळी आरती होवून शंभर ङ्गुटी पागोट्याने देवाच्या खडावा काल्याचे विद्यमान मानकरी मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर बांधण्यात आल्या. यानंतर हा सोहळा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील सभामंडप येथे दाखल झाला. येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर काल्याचा अभंग म्हणून दहीहंडी फोडण्यात आली.
यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी हा प्रसाद ग्रहण केला. यानंतर हा सोहळा महाव्दार घाट येथून चंद्रभागा नदी, कुंभार घाटावरून माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली मार्गे हरिदास वेस व काल्याच्या वाड्यात दाखल झाला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/581742870170113/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी रस्त्यावर हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. जागोजागी कुंकू, बुक्का, लाह्याची उधळण केली जात होती. उपस्थित हजारो वारकर्यांना उत्सवानंतर दही, लाह्यापासून बनविलेल्या काल्याचे वाटप करण्यात आले. गोपाळपूरच्या काल्यानंतर महाव्दार काला होताच आषाढी वारीची सांगता झाल्याचे मानले जाते.
□ आषाढी यात्रेत एसटीला 20 कोटींचे उत्पन्न
पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत एसटीला २० कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून राज्यभरातून ३ हजार ६५० बसेस यात्रेसाठी देण्यात आल्या होत्या. गेल्या यात्रेच्या मानाने एसटीच्या उत्पन्नात ५० लाखांची वाढ झाली असल्याची माहिती आगार प्रमुख सुधीर सुतार यांनी दिली.
पंढरपूर लागत ४ तात्पुरती बस स्थानके एसटी प्रशासनाने बनवली होती. यंदाच्या यात्रेतून एसटीला २० कोटी ५० लाखांचे उत्पन्न मिळाले. हे उत्पन्न ६ जुलै ते १३ जुलै या कालावधीत मिळाले आहे.
कोरोनामुळे दोन वर्षे आषाढी यात्रा भरली नाही. यामुळे एसटीचे कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने शासनाने यात्रा भरविण्यास परवानगी दिली. यंदा १५ लाखांहून अधिक भाविक येणार असल्याचा अंदाज प्रशासनाने
वर्तविला होता. त्यानुसार एसटीने नियोजन केले होते. मात्र पावसामुळे भाविकांचा प्रतिसाद कमी मिळाला. प्रवासी संख्या घातली गेल्याचे आगार प्रमुख सुतार यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/581740796836987/