पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील बिअर शॉपी फोडल्या प्रकरणी एकास अटक करून त्याकडून 56 हजार रुपयांच्या बिअर बॉक्स आणि कर्नाटक राज्यातील चोरीला गेलेली महिंद्रा बोलेरो गाडी पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच बियर बॉक्स चोरीला गेल्याची घटना घडली होती. Pandharpur taluka police handcuffed a thief who broke into a beer shop, sangola deadbody
फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील महेश बिअर शॉपी फाडून 66 हजार रुपयांच्या 25 बिअरचे बॉक्स चोरीला गेल्याची घटना 10 जुलै 2022 रोजी घडली होती. फिर्यादी उमाकांत काळे यांच्या फिर्यादीनुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पंढरपूर तालुका पोलीस आणि स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाला या गुन्ह्यातील आरोपी महमद मधुकर पवार (रा. ढोक बाभुळगाव ता. मोहोळ) हा मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे आल्याची माहिती मिळताच त्यांना ताब्यात घेतले.
त्याच्याकडून 56 हजार रुपयांचे 20 बिअरचे बॉक्स आणि कर्नाटक राज्यतून चोरीला गेलेली महिंद्रा बोलेरो गाडी ताब्यात घेतली. त्या आरोपीला 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याचे तपास अधिकारी पोलीस हवालदार नितीन चवरे यांनी दिली. या गुन्ह्यातील इतर तीन आरोपींचा तपास पोलीस करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/582480483429685/
□ अनोळखी इसमाचा खून केलेला मृतदेह सापडला, सांगोला परिसरातील घटना
सोलापूर – एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुनापवाडी (ता. सांगोला) येथील फॉरेस्ट मध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
गुनापवाडी येथील फॉरेस्टमध्ये असलेल्या नालाबंडिंगच्या चारीमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळाल्यानंतर सांगोल्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मयताच्या अंगावर तीष्ण शस्त्राच्या गंभीर जखमा आढळल्या.
अनोळखी मारेकऱ्यांनी त्याचा तीक्ष्ण शस्त्राने खून केला. आणि पुरावा नष्ट काण्यासाठी मृतदेह हिरवा रंगाच्या गुंडाळून प्लास्टिकच्या पोत्यामध्ये बांधून टाकून दिल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह रंगाने काळा सावळा असून त्याच्या चेहऱ्यावर बारीक दाढी आहे. तसेच त्याच्या अंगावर फक्त निळ्या रंगाची जीन्सची पॅन्ट आहे. मृतदेहासंबधी कोणास माहिती असल्यास त्यांनी सांगोला पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक निरीक्षक हुले यांनी केले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/582454143432319/