Wednesday, March 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

भंडारकवठे लोकमंगल कारखाना रस्ता झाला मृत्युचा सापळा, दररोज अपघात

Bhandarkawathe Lokmangal factory road became a death trap, daily accidents South Solapur

Surajya Digital by Surajya Digital
July 17, 2022
in Hot News, सोलापूर
0
भंडारकवठे लोकमंगल कारखाना रस्ता झाला मृत्युचा सापळा, दररोज अपघात
0
SHARES
577
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे लोकमंगल कारखाना ते माळकवठे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यावरून येता जाता कारखान्याचे कामगार आणि शेतकर्‍यांची दररोज अपघात होत आहेत. त्यात पाऊस पडला की वाहने अडकून पडतात. त्यात आणखी त्रास होत आहे. Bhandarkawathe Lokmangal factory road became a death trap, daily accidents South Solapur

या त्रासातून सोडवण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि शेतक-यांमधून होत आहे. मतदानासाठी पायपीट करणारे लोकप्रतिनिधी नंतर मात्र सोयीस्कर विसरून जात आहेत. सद्य परिस्थितीत या रस्त्यावरून येणे – जाणे मुश्किल नव्हे तर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या दयनीय झालेल्या भंडारकवठेपासून दोन किलोमीटर रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी होत आहे.

भंडारकवठे येथील महावितरणच्या उपकेंद्रापासून लोकमंगल कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून येथून चालत जाणे सुध्दा तारेवरची कसरत झाली आहे. अवघा दोन किलोमीटर अंतरावराचा हा रस्ता खराब झाला आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

लोकमंगल कारखान्याला कामाला जाणारे कर्मचा-यांना पावसाळ्यात आपला जीव मुठीत धरुन जावे लागत आहे. शेतकर्‍याची अवस्था देखील अतिशय बिकट झाली आहे. त्याचबरोबर वाड्या वस्तीवरील शाळकरी मुलांनाही याच रस्त्यावरून शाळेला जावे लागत आहे. यातच शाळकरी मुलाचे काही दुर्दैवाने बरे वाईट झाल्यानंतर लोकप्रतिनिधीना जाग येणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

 

हा रस्ता हा भंडारकवठे, माळकवठे, कुरघोटपासून ते राष्ट्रीय महामार्ग टाकळीला हा मार्ग जोडतो. या रस्यावरून तडवळ, धुळखेड, इंडी, विजयपूर आदी ठिकाणी जाण्यासाठी तेलगाव, कुसूर, उमरज, रेवतगाव, नंदूर,अरळी बोराळ,मंगळवेढा यासह अन्य गावातील नागरिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. ऊसतोड हंगामात तर कर्नाटकासह महाराष्ट्रातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून ऊसाची वाहतुक होते. त्यामुळे हा रस्ता आणखी खराब होत आहे.

 

या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे. या रखडलेल्या रस्त्याचे काम संबंधित विभागाने लक्ष घालून रस्त्याचे काम मार्गी लावल्यास नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल व होणा-या अपघात टाळण्यास मदत होणार असल्याचे नागरिक म्हणत आहेत.

□ शेतकरी, कर्मचा-यांची गैरसोय दूर करावी

 

भंडारकवठेच्या महावितरण उपकेंद्र ते लोकमंगल कारखाना रोडचा अवघा दोन किलोमीटर अंतराचा रस्ता बिकट आहे व रखडला आहे. यामुळे पावसाळ्यात ये-जा करणे म्हणजे आपले जिव मुठीत धरुन जावे लागत आहे. हत्ती गेल शेपुट राहिल अशी गत ह्या रस्त्याची झाली आहे. हा रस्ता झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल, असे तेथील नागरिक सुधीर कारभारी ( शेतकरी) यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

Tags: #Bhandarkawathe #Lokmangal #factory #road #deathtrap #daily #accidents #SouthSolapur#दक्षिणसोलापूर #भंडारकवठे #लोकमंगल #कारखाना #रस्ता #मृत्युचा #सापळा #दररोज #अपघात
Previous Post

पाकिट बंद, लेबल असलेल्या खाद्यपदार्थांवर जीएसटी लागणार, आरोग्यसेवा महागणार

Next Post

एखाद्या राजकीय पक्षात सहभागी होणे, अन्यथा बंडखोर आमदार ठरू शकतात अपात्र

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
एखाद्या राजकीय पक्षात सहभागी होणे, अन्यथा  बंडखोर आमदार ठरू शकतात अपात्र

एखाद्या राजकीय पक्षात सहभागी होणे, अन्यथा बंडखोर आमदार ठरू शकतात अपात्र

वार्ता संग्रह

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697